बनावट अंशकालीन प्रमाणपत्र प्रकरणी बीडमध्ये दोघांना अटक
- आरोपींकडून बीड तहसीलदारांचे दोन शिक्के जप्त
बनावट अंशकालीन प्रमाणपत्र प्रकरणी बीडमध्ये दोघांना अटक
– आरोपींकडून बीड तहसीलदारांचे दोन शिक्के जप्त
बीड : राज्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी एका उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र सादर केले. या प्रकरणी सदरील उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये यवतमाळ शहर पोलिसांनी याच प्रकरणात बीड येथील दोघांना बुधवारी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून बीड तहसीलदारांचे दोन शिक्के जप्त केले आहेत.
नगर-बीड-परळी रेल्वे अंमळनेर ते विघनवाडीपर्यंत धावली
म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण रद्द करा
अजित पवारांचा पक्ष म्हणजे आलीबाबा आणि ४० चोरांची टोळी – महेबुब शेख
बनावट अंशकालीन प्रमाणपत्र प्रकरणी अटक करण्यात आलेल्यामध्ये महादेव दत्तात्रय वानरे (४९, रा. एमआयडीसी बहिरवाडी, जि. बीड) आणि श्रीराम भैरवनाथ शेजाळ (५४, रा. शिक्षक कॉलनी, खडकपुरा, बीड) अशी नावे आहेत. पोलिस शिपाई भरतीसाठी ९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बीड जिल्ह्यातील खांबा लिंबा येथील अंबादास सोनवणे या उमेदवाराची निवड झाल्यानंतर या उमेदवाराला २५ एप्रिल २०२३ रोजी मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्यात आले. त्यावेळी सोनवणेने याने सादर केलेल्या प्रमाणपत्राची बीड तहसीलदारांकडून पडताळणी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी यांना बीड तहसील कार्यालय गाठून चौकशी केली. या वेळी बीड तहसीलदारांनी २० जून २०२३ रोजी दिलेल्या अहवालामध्ये सोनवणे याने सादर केलेले अंशकालीन प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० हजार रुपये घेऊन अजय वानरे याने अंबादास सोनवणेला बनावट अंशकालीन प्रमाणपत्र काढून दिल्याचे समोर आले. यावरून बीड जिल्ह्यातील पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महादेव वानरे याला ताब्यात घेतले. वानरेच्या चौकशीत त्याने बीड तहसीलचा अंशकालीन कर्मचारी श्रीराम शेजाळ याच्यामार्फत प्रमाणपत्र काढल्याचे समोर आले.
एक दिवसाची पोलिस कोठडी
बनावट प्रमाणपत्रप्रकरणी पोलिसांनी श्रीराम शेजाळ आणि महादेव वानरे या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास दांडे करत आहेत.