बिडकीन ऑरीक सिटीमध्ये टोयोटा-किर्लोस्करकडून २० हजार कोटींची गुंतवणूक

- शहराच्या विकासाला अँकर प्रकल्पातून मोठी गती

0

बिडकीन ऑरीक सिटीमध्ये टोयोटा-किर्लोस्करकडून २० हजार कोटींची गुंतवणूक

– शहराच्या विकासाला अँकर प्रकल्पातून मोठी गती

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन ऑरीक सिटीमध्ये ८५० एकरांची जागा, २० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करत टोयोटा-किर्लोस्करने छत्रपती संभाजीनगरला नवी आशा दाखवली असल्याचे समोर आले आहे. शहरातील उद्योग क्षेत्राला हवा असलेला हा एक अँकर प्रकल्प शहराच्या विकासाला मोठी गती देईल, असे सांगितले जात आहे.

नव्या प्रकल्पामुळे शहरातील उद्योग भरारी घेतील आणि येत्या पाच वर्षांत संभाजीनगर देशातील तिसºया क्रमांकाचे आॅटोमोबाइल निर्यातदार शहर बनेल, असा विश्वास उद्योग वर्तुळात निर्माण झाला आहे. तसेच शहरातील उद्योजकांना नियार्तीची वाट सुखकर व्हावी, म्हणून सीएमआयएने शथीर्चे प्रयत्न केले. निर्यात मार्गदर्शनासाठी पूर्णवेळ कार्यालय सुरू करण्याची मागणी सीएमआयए आणि इतर उद्योजक संघटना करत आहेत. सुरक्षितता आणि अचूक मार्गदर्शन मिळाल्यास निर्यातीला गती मिळेल, असे सांगितले जात आहे. या शहरात बजाज, फोक्सवॅगन, स्कोडा, ऑडी, टोयोटा, जेएसडब्ल्यू, अथर, गोर्गो या कंपन्यांच्या वाहनांची शहरात निर्मिती होते. या वाहनांसाठी लागणाºया सुट्या भागांची शहरात निर्मिती केली जाते.

या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील जनतेचे जीवनमान उंचावेल तसेच तंत्रज्ञानाचे हस्तांतर होईल. याबरोबरच स्थानिक कौशल्याला अधिष्ठान मिळेल. यातून पायाभूत सुविधांचा मोठा विकास होईल यामुळे टोयोटा प्रकल्पामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाईल. याशिवाय शहरातील बदलांमुळे आणखी महत्त्वाचे प्रकल्प येऊ शकतील. यातून पाचव्या क्रमांकावरून शहर पुढच्या पाच वर्षांत आणखी पुढच्या टप्प्यावर पोहोचेल यात शंका नाही, असे अखिल भारतीय वाणिज्य परिषद माजी अध्यक्ष डॉ. वाल्मीक सरोदे यांनी सांगितले.

उद्योजक मोठी भरारी मारतील

टोयोटासारखा प्रकल्प ४० वर्षांनंतर शहरात आला आहे. या प्रकल्पामुळे शहराचे झपाट्याने चित्र बदलेल. तसेच निर्यात वाढवण्यासाठी आमच्या संघटना प्रयत्न करीत आहेत. प्रशिक्षण आणि पर्याय दिल्यास उद्योजक आणखी मोठी भरारी मारतील, असे उद्योजक प्रीतीश चॅटर्जी यांनी सांगितले.

१०० देशांत छत्रपती संभाजीनगरातून निर्यात

या शहरातून २०२२-२३ मध्ये २४,९८६ कोटींवर निर्यात झाली. यामध्ये एकट्या आॅटोमोबाइल क्षेत्राचा वाटा ७,९०० कोटींचा होता. जगभरातील १०० देशांत छत्रपती संभाजीनगरातून निर्यात केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.