बीड शहरात काढली 3 किलोमीटर तिरंगा रॅली
-350 फुटांचा तिरंगा ध्वज, 2 हजार नागरिकांचा सहभाग
बीड : स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. यामध्ये पेठ बीड शहर कृती विकास समितीने मंगळवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शहरातील बालाजी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी ४ तास ३५० फुटांचा तिरंगा ध्वज हातात घेऊन 3 किलोमीटर तिरंगा रॅली काढली. यावेळी शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी असे २ हजार नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व पेठ बीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमृत सारडा यांनी केले होते.
शहरातील बालाजी मंदिर मोंढा रोड येथून तिरंगा रॅलीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. काळा हनुमान ठाणामार्गे रॅली महावीर चौक-तेल गल्ली-बाबा मशीदमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचली. या वेळी पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. दुपारी शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या तिरंगा रॅलीचा समारोप झाला.
शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन द्या – सिटू कामगार संघटना
भोकरदन विधानसभेसाठी आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरु – विजय वडेट्टीवार
कर्जासाठी आडवणूक करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला शिकवला धडा
नाष्टा, पाण्याची सोय
शहरातून निघालेल्या 3 किलोमीटर तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या वतीने बालाजी मंदिरात नाष्टा, पाण्याची सोय सकाळी १० वाजता करण्यात आली होती. त्यानंतर रॅली मार्गावर व्यापारी, नागरिकांना पाण्याचे जार, पाणी बॉटल जागोजागी वाटप केले.
रुग्णवाहिकेची व्यवस्था
बीड पालिकेच्या वतीने रॅलीतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी दोन टँकर ठेवण्यात आले होते. तर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एक रुग्णवाहिका होती. या वेळी पोलिसांचा बंदोबस्तही या तिरंगा रॅलीसाठी देण्यात आला होता.