जायकवाडी धरणात 4.13 टक्के पाणीसाठा
दोन महिने पिण्यासाठी पाणी पुरेल : अभियंता
जायकवाडी धरणात ४.१३ टक्के पाणीसाठा
-दोन महिने पिण्यासाठी पाणी पुरेल : अभियंता
जायकवाडी : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांची ज्या धरणाच्या पाण्यावर तहान भागवली जाते त्यात सध्या केवळ ४.१३ टक्के पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले असले तरीही पाऊस धरण क्षेत्रात व वरील भागात देखील नसल्याने आवक केवळ सध्या स्थानिक रिमझिम पावसाने सध्या धरणात १९६ क्युसेकने झाली असली तरी पाणीसाठ्यात वाढ झालेली दिसत नाही. हा पाणीसाठा केवळ दोन महिने पिण्यासाठी पुरेल एवढाच असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता विजय काकडे यांनी दिली.
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालनासह पश्चिम महाराष्ट्रातील धरणावरील पाण्याच्या पाणीपुरवठा योजनेला मोठी झळ बसू शकते. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे. सध्या जायकवाडीचा पाणीसाठा १४९६.३४ फूट, तर ४५६.८४ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ८२७.७२३ दलघमी, जिवंत साठा ८९.६१७ तर ४.१३ टक्के आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी दोन महिने पुरेल असे सांगितले जात आहे. यामध्ये सिल्लोड शहरासह बारा खेड्यांना पाणीपुरवठा करणाºया खेळणा मध्यम प्रकल्पात सध्या ३० टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाणी वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्हीमुळे आळा बसेल मुंडे यांचे प्रतिपादन
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत पावसासाठी सहस्रधारा अभिषेक
तालुक्यात अद्याप मोठा पाऊस न पडल्याने खेळणा मध्यम प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही. खेळणा धरणाच्यावर असलेल्या केळगाव मुर्डेश्वर येथील धरणात सध्या ४५ % जलसाठा असून, हे धरण १०० % भरल्यावर उर्वरित पाणी खेळना नदीने खेळणा धरणात येते.
पाणी कपात करावी लागणार
जायकवाडी धरणात सध्या केवळ ४ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी पिण्यासाठी पुढील दोन महिने पुरेल. त्यानंतर धरणाच्या मृत साठ्यातून पाणी वापरण्याची वेळ येईल. त्यापूर्वी जोरदार पाऊस झाला तर पाणी संकट टळेल, नसता मराठवाड्यातील अनेक पाणीपुरवठा योजनेला पाणी कपात धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे, असे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाबद्दल अधिक माहिती
पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
धरणात पाणी सोडले जाईल
जायकवाडीच्या वरील भागातील गंगापूर धरणात ३३.६७, दारणा ४९.९५, मुकणे १६.०४, पालखेड १३.६७, करंजवण १.८७ एवढा साठा आहे. वरील धरणे भरल्यानंतर जायकवाडीत पाणी सोडले जाईल, असे अभियंत्यांनी सांगितले.