मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 568 मिमी पावसाची नोंद
-चार वर्षात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये १२.७१ दलघमी नवीन पाणीसाठा
मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 568 मिमी पावसाची नोंद
-चार वर्षात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये १२.७१ दलघमी नवीन पाणीसाठा
बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यात आसणाऱ्या मांजरा धरणातील जलसाठ्यामुळे लातूर शहराची तहाण भागवली जाते. या धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ५६८ मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे चार वर्षात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये १२.७१ दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. याशिवाय संगमेश्वर व महासांगवी हे दोन्ही मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने दररोज १४.०५ क्युसेक पाण्याची प्रकल्पात आवक होत आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ५३.३५ दलघमी पाणीसाठा आहे. २२ योजनांसाठी हा पाणीसाठा ६ महिन्यांपर्यंत तर लातूर शहरासह एमआयडीसीची सात महिन्यांपर्यंत तहान भागणार असल्याचे सांगितले जात आहे.
335 शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा
संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १८ जागा लढविणार
ज्ञानराधा बँकेच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा
मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 568 मिमी पावसाची नोंद: बीड जिल्ह्यातील मांजरा व धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पातून लातूर शहरासह औसा, निलंगा शहराला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे प्रकल्प कधी भरतील याची कायम प्रतीक्षा असते. यंदाही जून महिन्यापासून पाऊस पडत आहे. विशेषत: मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १० ऑगस्टपर्यंत ५६८ मिमी पाऊस झाला आहे. मागील चार वर्षात पहिल्यांदाच ऑगस्टपर्यंत इतका पाऊस झाला. या पावसाने मृत साठ्यातील धरण जीवंत साठ्यात आणले. ४४ दलघमीवर गेलेली पाणीपातळी आता ५३.३५ दलघमीवर आली आहे. मांजरा धरणातून २२ योजनांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात सर्वाधिक पाणी उपसा लातूर शहर, एमआयडीसी साठी होतो. दररोज ७० घनमीटर याप्रमाणे शहराला २ दलघमी पाणी लागते. वषार्ला २० दलघमी पाण्याची आवश्यकता आहे.
मांजरा धरणातील पाणी साठ्यात दररोज वाढ होत आहे. प्रती दिन १४. ०५ क्युसेक इतकी आवक होत आहे. धरणातील पाणी साठ्यात आजतागायत १२.७१ दलघमीने वाढ झाली आहे. एकूण पाणीसाठा ५३. ३५ टक्के इतका आहे. जीवंत पाणीसाठा ३३ पर्यंत झाला तरी पिण्यासाठीच आरक्षित राहणार आहेत. ३३ टक्क्यांच्या पुढील पाण्याचा सिंचनासाठी वापर करता येणार आहे. मांजरा धरणात उपलब्ध असलेला ५३. ३५ दलघमी इतका पाणीसाठा लक्षात घेता २२ योजनांना ६ महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. तर लातूर शहराचा विचार केल्यास ७ महिन्यांपर्यंत लातूरकरांची तहान भागणार आहे.
पाण्याची आवक सुरु
मांजरा प्रकल्पाच्या वरील भागात संगमेश्वर व महासांगवी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. हे प्रकल्प यंदा ऑगस्टमध्येच १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे या पाण्याची प्रकल्पात आवक सुरु झाली आहे. पावसाळ्याच्या तीन महिन्यात भीज पाऊस झाला आहे. जमिनीची तहान भागली आहे. भुम, पाटोदा या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास हे पाणी धरणात येणार आहे, असे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.