अबबब वजन 610 किलो वरून 63 किलो अवघ्या 6 महिन्यात

542 किलो वजन सौदीच्या माजी राजा अब्दुल्ला यांच्या मदतीने कमी केले

0

अबबब वजन 610 किलो वरून 63 किलो अवघ्या 6 महिन्यात

542 किलो वजन सौदीच्या माजी राजा अब्दुल्ला यांच्या मदतीने कमी केले

सौदी अरेबियाचा खालिद बिन मोहसीन शारी जगातील सर्वात जास्त वजन असलेला जिवंत व्यक्ती 6 महिन्यांत 542 किलो वजन सौदीच्या माजी राजा अब्दुल्ला यांच्या मदतीने कमी केले. आम्हाला अनेकदा वजन कमी करण्याच्या उल्लेखनीय कथा येतात. तथापि, ही कथा महत्त्वपूर्ण बदलाचे एक विलक्षण उदाहरण म्हणून उभी आहे.

नवी दिल्ली: खालिद बिन मोहसीन शारी हा जगातील सर्वात जास्त वजन असलेला व्यक्ती म्हणून ओळख असलेला व्यक्ती त्याचे वजन 2013 मध्ये 610 किलो एव्हढे होते.
मागील 3 वर्षांपासून अंथरुणात होता. अत्यावश्यक गरजांसाठीही त्याला परिवाराची व मित्रांची मदत घ्यावी लागायची. त्याच्या या वाईट अवस्थेवर सौदी अरेबियाचे माजी राजा अब्दुल्ला यांनी त्याचे जीव वाचविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे ठरविले. आणि एक योजना आखली.
राजा अब्दुल्लाह यांनी उच्च प्रतीची मेडिकल सेवेची व्यवस्था केली. वजन कमी करण्यासाठी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया, संतुलित आहार, आणि नियमित योग्य व्यायाम याची योजना बनवली गेली. तसेच कमी झालेली गतिशीलता पुन्हा मिळविन्यासाठी फिजिओथेरपी आखली गेली. आणि याचा अविश्वसनीय रिझल्ट आला. या 6 महिन्याच्या अवघड उपचारातून आणि योग्य डायट प्लान आणि आहारातील पथ्ये पाळून 30 डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी करून दाखविले. खालिदला उपचारासाठी स्पेशल बेड आणि फोर्कलिफ्ट वापरून त्याच्या जाझान येथील राहत्या घरातून सौदीच्या राजधानी रियाध येथील किंग फहाद मेडिकल सिटी येथे हलविण्यात आले होते.

खालीद बिन मोहसीन शारी याचे 2023 पर्यंत अविश्वसनीय एकूण 542 किलो इतके वजन कमी करण्यात आले. आता त्याचे वजन केवळ 63.5 किलो झाले. मात्र कमी वेळेत एवढे जास्त वजन कमी केल्याने त्याच्या शरीराची त्वचा अतिरिक्त झाली होती. त्यामुळे त्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यात आली. आता खालिद बिन मोहसीन शारी यास सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि इतर लोक प्रेमाने “द स्माइलिंग मॅन” म्हणून ओळखतात.

सारांश
खालिद बिन मोहसेन शारी, पूर्वी 610 किलोग्रॅम वजनाचा सर्वात वजनदार माणूस, तीन वर्षांहून अधिक काळ तो अंथरुणाला खिळला होता, याचा जीव वाचविण्यासाठी सौदी अरेबियाचे राजा अब्दुल्ला यांच्या हस्तक्षेपामुळे 542 किलोग्रॅम यशस्वीरित्या कमी केले. व्यायाम, योग्य डायट प्लान, शस्त्रक्रिया आणि विशेष पथ्ये यासह सखोल वैद्यकीय सेवा मिळाल्यामुळे, शारीचे वजन 2023 पर्यंत 63.5 किलो पर्यंत आणले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.