773 कोटींच्या कामांना मंजुरी जिल्हा नियोजन समिती बैठक

घाटीसह रुग्णालयांच्या ३४ कामांचा समावेश

0

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ७७३ कोटींच्या कामांना मंजुरी

-घाटीसह रुग्णालयांच्या ३४ कामांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीची घेण्यात येणाºया अखेरच्या बैठकीत ७७३ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली आणि अखेरची बैठक होती. मात्र आपण पुन्हा येऊ, अशी घोषणा करीत सत्तार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना या वेळी चांगलेच डिवचले होते. यावेळी पालकमंत्रिपदासाठी त्यांच्यासोबत स्पर्धेत असलेले आमदार संजय शिरसाट या बैठकीत अनुपस्थित होते. सत्तारांनी मंजूर केलेल्या ७७३ कोटींच्या कामांमध्ये घाटीसह रुग्णालयांच्या ३४ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली असली तरी शहरासाठीच्या प्रकल्पांना डावलण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक मागील ७ महिन्यांपासून झाली नव्हती. यावेळी मावळते पालकमंत्री संदिपान भुमरे खासदार झाल्यानंतर या पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. मंत्री अतुल सावे यांच्यासाठी हे पद मिळावे यासाठी भाजपने मुंबईपर्यंत धावधाव केली होती. त्यातच शिंदेसेनेचे राज्य प्रवक्ते संजय शिरसाट मंत्रिपद नसतानाही पालकमंत्री या पदाकडे डोळे लावून बसले होते. त्याचवेळी शिंदेसेनेचे जिल्ह्यातील दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय ताकद दाखवत हे पद आपल्याकडे ओढून आणल्याने शिरसाट आणि त्यांच्या समर्थंकामध्ये नाराजी पसरल्याचे कालच्या मुख्यमंत्री शिंदेच्या दौºयातून ते समोर आले.

मी पुन्हा येईन : सत्तार

सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली शनिवारची पहिली व निवडणुकीपूवीर्ची शेवटची बैठक होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय शिरसाट अनुपस्थित होते. ते अनुपस्थित का राहिले या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच विचारा, असे सत्तार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले. पालकमंत्री म्हणून आपली ही शेवटची बैठक नाही तर मी पुन्हा येईन, असे म्हणत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना डिवचल्याने यावर शिरसाट काय प्रतिक्रीया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.