यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल
-दिल्लीच्या साकेत कोर्टाने राठी आणि इतरांना पाठवले समन्स
नवी दिल्ली : आपल्या परखड राजकीय विश्लेषणामुळे अल्पावधीतच नावारुपास आलेल्या यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात एक फेक ट्विट केल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने यूट्यूबर ध्रुव राठी आणि इतरांना समन्स पाठवले आहेत. भाजपचे मुंबई विभागाचे प्रवक्ते सुरेश करमशी नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. नखुआ सांगतात की ध्रुव राठीने एका व्हिडिओमध्ये त्यांना हिंसक आणि असभ्य ट्रोल म्हटले होते.
अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २७५ कोटी निधीची तरतूद
मानहानीच्या याचिकेत सुरेश करमशी नखुआ यांनी म्हटले आहे की ध्रुव राठी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यालयात अंकित जैन, सुरेश नखुआ आणि तजिंदर बग्गा यांसारख्या ट्रोलर्सना होस्ट केले ज्यांनी हिंसाचार पसरवला आणि इतरांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली. नखुआ यांनी ७ जुलै रोजी ध्रुवविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी १९ जुलै २०२४ रोजी हे समन्स जारी केले होते. मानहानीच्या खटल्यानुसार, ध्रुव राठीने त्याच दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याचे शीर्षक होते – ‘माय रिप्लाय टू गोडी यूट्यूबर्स. एल्विश यादव ध्रुव राठी’. २४ जुलै रोजी संध्याकाळी ७:२० वाजेपर्यंत या व्हिडिओला २७,४५७,६०० व्ह्यूज आणि २५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.