पाण्यासाठी अंजनडोहकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा
मोर्चात महिलांचा मोठा सहभाग
किल्ले धारूर : तालुक्यातील अंजनडोह येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढला यावेळी महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
माथेफिरू प्रशांत कोरटकर वर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी
सरकारने जल जीवन मिशनच्या माध्यमातून घरापर्यंत पाणी पोहोच करण्याची घोषणा जरी केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे. सरपंच उषा सोळंके यांनी वेळोवेळी निवेदने देऊनही जल जीवन मिशनचे रखडलेले काम मार्गी लावले यासाठी प्रयत्न केले मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासन दखल घेत नसल्याने सरपंच उषा सोळंके यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.
फुलेंच्या विचारांशी द्रोह करणा-या हाकेला बुटाने का हाणू नये?
या निवेदनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने अखेर सरपंच उषा सोळंके यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रखडलेले जल जीवन मिशनचे काम मार्गी लावून पाण्याचा प्रश्न मिटविण्याची मागणी केली. यावेळी उपसरपंच प्रकाश सोळंके, प्रमोद सोळंके विकास सोळंके यांच्यासह मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होती.
बसस्थानक परिसरातील धुळीचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू : सोनवणे