शिक्षकाकडून होणा-या अन्यायाविरोधात बालासाहेब शिंदे यांचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण माधव भिसे यांचेवर कारवाई करण्याची मागणी – उपोषणाला राष्ट्रीय किसान मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाचा पाठिंबा

सदरील प्रकरणातील शिक्षक जर अनुसूचित जमातीमधील कुटुंबावर अन्याय करीत असेल तर तो शाळेतील विद्यार्थ्यांना नेमके कोणते धडे देत असेल? कारण शिक्षक हा येणा-या पिढीला सत्याचा मार्ग दाखवत असतो मात्र लातूर जिल्ह्यात माधव भिसे सारखे शिक्षक नेमका कोणता समाज निर्माण करू पाहत आहेत हा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो.

0 625

शिक्षकाकडून होणा-या अन्यायाविरोधात बालासाहेब शिंदे यांचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण
माधव भिसे यांचेवर कारवाई करण्याची मागणी
– उपोषणाला राष्ट्रीय किसान मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाचा पाठिंबा

लातूर : जिल्ह्यातील घनसरगाव येथील बालासाहेब शिंदे यांच्या कुटुंबावर त्यांचेच गावातील एका शिक्षकाकडून वारंवार मानसिक छळ होत असून जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून सदरील शिक्षकावर कारवाई करावी असे निवेदन दिले. या उपोषनाला राष्ट्रीय किसान मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाचा पाठिंबा दिला.


रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथील बालासाहेब शिंदे हे अनुसूचित जमातीमधील असून त्यांना गावातील शिक्षक माधव संभाजी भिसे हे वारंवार शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. बालासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला गाव सोडून जाण्यासाठी सदरील शिक्षक धमकी देऊन वारंवार मानसिक छळ करीत आहेत. यासंदर्भात सदरील कुटुंबाने यापूर्वी रेणापूर पोलिस स्टेशन, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, लातूर यांचेकडे अर्जाद्वारे संरक्षण मिळावे आणि सदरील व्यक्तीवर कडक कारवाई करावी यासाठी लेखी मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात रेणापूर पोलिस स्टेशन व पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तीवर कारवाई करून आमच्या जिवीताचे संरक्षक करावे यासाठी मागणी केली.

राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने ! ✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
यावेळी बालासाहेब शिंदे यांच्या पत्नी सुमनबाई शिंदे यांनी सांगितले की, माधव भिसे यांच्याकडून वारंवार मानसिक छळ होत असून सदरील व्यकती मारहाण करून आमचा मुलगा प्रेम शिंदे याचा जिवे मारून टकाल्यानंतर समाधान होईल अशी धमकी देत असल्याचे सांगितले. या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष विशाल लोमटे व भारत मुक्ती मोर्चाचे सुशांत अल्टे उपस्थित होते.  यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष दिपक इंगळे यांनी म्हटले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदार बालासाहेब शिंदे यांचे प्रकारण मार्गी लावावे. शिंदे हे अनुसूचित जमातीमधील सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना जाणिवपूर्वक त्रास देऊन माधन भिसे हे त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने जर का बालासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला काही झाले तरी राष्ट्रीय किसान मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिपक इंगळे यांनी दिला आहे.

नेत्यांच्या कंबरेला मिठ्या मारणा-यांना हार्प काय घंटा समजणार? ✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
सदरील शिक्षकाचे वर्तन हे गुंड प्रवत्तीचे असून हा व्यक्ती बाभळीच्या बीया शेतात फेकतो. आमचे आई वडील सर्वसाधारण असल्याचे बघुन तो वारंवार त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे. मात्र याविरोधात रेणापूर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिस कर्मचारी हंगरगे हे तक्रार नोंदवून घेताना स्वतःच्या मनाची तक्रार नोंदवतात. यावेळी माझे वडील बालासाहेब शिंदे हे सदरील तक्रारी संबंधी माहिती देत असताना त्यांना बाहेर हाकलून देतात. हे कर्मचारी तक्रारदाराला विश्वासात न घेता स्वतःच्या मनाची तक्रार नोंदवून तक्रार दार माझी आई सुमनबाई व वडील बालासाहेब शिंदे यांचेवर दबाव निर्माण करून बळजळरीने तक्रारीवर सही करून घेतात. भिसे हे पेशाने शिक्षक असल्याने ते पैशाच्या जोरावर पोलिसांचे हात रंगवून त्यांचे तोंड बंद करीत आहेत.  गुंड प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी राहून स्वत:चे कर्तव्य विसरलेले पोलिस यांच्या हालगर्जीपणामुळे आमचे काही बरे वाईट झाले तर यांची सर्वस्वी जबाबदारी ही रेणापूर पोलिस स्टेशनची असेल, असे उपोषणकर्ते प्रेम शिंदे म्हणाले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून ? ✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे

सदरील प्रकरणातील शिक्षक जर अनुसूचित जमातीमधील कुटुंबावर अन्याय करीत असेल तर तो शाळेतील विद्यार्थ्यांना नेमके कोणते धडे देत असेल? कारण शिक्षक हा येणा-या पिढीला सत्याचा मार्ग दाखवत असतो मात्र लातूर जिल्ह्यात माधव भिसे सारखे शिक्षक नेमका कोणता समाज निर्माण करू पाहत आहेत हा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो. अन्याय आणि अत्याचार करणा-या शिक्षकाला पाठीशी घालणा-या रेणापूर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही हे देखील पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षकांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. नाहीतर असे नतभ्रष्ट शिक्षक पैशाच्या जीवावर प्रशासकीय यंत्रणा पोखरून खिळखिळी करून सामान्य माणसांना जगणे मुश्किल करतील त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकाणात लक्ष देऊन अशा शिक्षकांना धडा शिकवला पाहीजे तेव्हा कुठे जनसामान्य लोक सुखाने जगतील.

Leave A Reply

Your email address will not be published.