बीड भाजप जिल्हाध्यक्ष मस्के उमेदवारीसाठी जरांगेंच्या भेटीला

-माजी आमदार संगिता ठोंबरे केली जरांगेंकडे उमेदवारीची मागणी

0

बीड भाजप जिल्हाध्यक्ष मस्के उमेदवारीसाठी जरांगेंच्या भेटीला


-माजी आमदार संगिता ठोंबरे केली जरांगेंकडे उमेदवारीची मागणी

जालना : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील डेटा घेऊन येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. यामुळे आंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांनी येऊन भेटी दिल्या. यामध्ये बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे तर पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक तथा भाजपच्या बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह आम आदमी पार्टीच्या पदाधिकाºयांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

यावेळी केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. ठोंबरे या केज मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर भाजपचे बीड भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे बीड विधानसभेसाठी बांशिंग बांधून उभे आहेत. भाजप समर्थक राजेंद्र मस्के यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचा बनाव करून नंतर पक्षश्रेष्टींच्या हातात आणि लोकसभेला भाजपला साथ दिल्याने त्यांच्यावर बीड मतदार संघातील मराठा नाराज आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मस्केंना तिकीट दिल्यास बीड मतदार संघात पराभव होण्याची शकयता आहे.

यावेळी संगीता ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडातना म्हणाल्या की, मनोज जरांगे हे जर राजकीय निर्णय घेणार असतील तर त्यांनी सकारात्मकदृष्ट्या विचार करावा. तसेच बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपण उमेदवारी नव्हे तर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या मनात असलेली विधानसभेची उमेदवारीची इच्छा  लपून राहत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.