माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची मोठी घोषणा
-राष्ट्रीय जनहित पक्षाकडून विधानभा निवडणूक लढविणार
मुंबई : बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, आपण राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू केली आहे. त्यात निवडणूक पुढे ढकलण्यात आली असली तरी देखील इच्छुक उमेदवारांनी देखील जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी देखील नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना आपल्या उमेदवारीची घोषणा करताना राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूका पुढे ढकलून सरकार रडीचा डाव खेळतेय – खासदार सुप्रिया सुळे
बूथ अध्यक्षांच्या मुलीसोबत अश्लील चॅट प्रकरणी भाजप आमदार हंसराजवर गुन्हा दाखल
आहिल्यानगरमधील वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश
माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आपण वसोर्वा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून शामराव भोसले ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ही त्यांनी सांगितले.