अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा

तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा

0

अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा

तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मंगळवारी रोजी चालू आर्थिक वर्ष २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यासोबतच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे.

सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशन: खासगी क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?

सध्याच्या घडीला कॅन्सरच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या रुग्णांना उपचार घेण्यासाठी लागणा-या खर्चात कपात व्हावी यासाठी या अर्थसंकल्पातील घोषणेचा फायदा होणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णावर उपचार करताना त्यावर करण्यात येणारे उपचार आणि औषधांवर करताना रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होते. कारण होणाऱ्या खर्च हा मोठ्या असतो. पण या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आता काही प्रमाणात का होईना कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळू शकेल.

या अर्थसंकल्पात सरकारने कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे, यामुळे कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरली जाणारी काही औषधे आणि उपकरणे स्वस्त होतील. केंद्राने कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या आणखी तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवल्याच्या घोषणेचा थेट फायदा कॅन्सरवरील उपचार घेणाऱ्या रुग्णांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकार सकारात्मक

यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. याशिवाय आरोग्य मंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम अंतर्गत वैद्यकीय एक्स-रे मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील बेसिक कस्टम ड्युटी (बीसीडी) मध्ये तपशीलवार बदलदेखील केले. हे उपाय वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक उत्पादन आणि नवीन उपक्रमांना समर्थन देत आरोग्य सेवा परवडणारी आणि सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत असे सांगितले जात आहे.

गर्भाशयाच्या लसीकरणास प्रोत्साहन

अर्थमंत्री सीतारमण यांनी लसीकरण आणि मिशन इंद्रधनुष व्यवस्थापित करण्यासाठी U-WIN व्यासपीठ देशभरात आणले. तसेच देशातील ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लसीकरण करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच फेब्रुवारी २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान सीतारमण यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश करण्यासाठी आरोग्य सेवा कव्हरेज वाढवण्याची घोषणा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.