मांजरा धरण मृत साठ्यातून बाहेर
-१.०३ टक्के जिवंत पाणी साठा
केज : लातूर, बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरण क्षेत्रात पावसाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीत केवळ ८ दलघमी इतका पाणीसाठा वाढला आहे. यामुळे धरण हे मृतसाठ्यातून बाहेर आले असून धरणात १.०३ टक्के जिवंत पाणी साठा आहे. या परिसरात मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
तालुक्यातील धनेगाव येथील २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या मांजरा धरणातून लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या ५ शहरासह येडेश्वरी साखर कारखाना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना व केज, कळंब, लातूर तालुक्यातील ६३ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या सर्व पाणी पुरवठा योजनांना वर्षभर २५ दलघमी इतके पाणी पुरविले जाते.
अखिल भारतीय छावा संघटना शेवटपर्यंत जरांगेंसोबत
सततच्या पावसामुळे पिके संकटात
महाराष्ट्रात आज सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव
यंदा पावसाने सुरुवात चांगली केल्याने पेरण्या वेळेवर झाल्या. पुढे ही पाऊस पडत आहे. मात्र गतवर्षी तालुक्यातील लहान – मोठे तलावांनी तळ गाठला होता. हे तलाव भरल्यानंतर नद्या भरून वाहतात. या नद्यांचे पाणी मांजरा नदीतून धरणात जाते. त्यानंतर धरणात पाण्याची आवक होते. आणखी मांजरा नदी वाहत नसल्याने धरणात पाण्याची आवक झालेली नाही. मात्र धरण क्षेत्रात दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ५१४ मिलिमीटर पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात ८.११ दलघमी इतकी वाढ झाली आहे. धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे.
धरणात आता १.०३ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. परतीच्या पावसावर धरण ओव्हरफ्लो होत असल्याने परतीच्या पावसाकडे लक्ष लागणार आहे.
या धरणाच्या माध्यमातून ६१ गावांतील शेतकºयांना सिंचनासाठी लाभ मिळत आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने धरणातील पाणी गतवर्षी ऑगस्ट महिन्यापासून पिण्यासाठी आरक्षित केले होते. त्यानंतर २४ मे पर्यंत जिवंत साठ्यातील पाणी पुरविण्यात आले होते. २५ मे रोजी धरण हे मृत साठ्यात गेल्याने मृत साठ्यात ४७.१३० दलघमी इतके पाणी शिल्लक राहिले होते.
अपेक्षित पाणी साठा होणे महत्वाचे
धरणात सध्या १.८२१ दलघमी इतका जिवंत पाणी साठा असून धरणातील उपलब्ध ४८.९५१ दलघमी इतके पाणी सहा महिने पुरते. मात्र भविष्यातील दृष्टीने धरणात अपेक्षित पाणी साठा होणे महत्वाचे आहे, असे मांजरा धरण शाखाधिकारी, सूरज निकम यांनी सांगितले.