केंद्र सरकार रेल्वे संदर्भात इरकॉन मधील स्टेक विकण्याच्या तयारीत – आपला हिस्सा विकून ११०० कोटी रुपये उभे करण्याच्या सरकारचा प्रयत्न

0 89

केंद्र सरकार रेल्वे संदर्भात इरकॉन मधील स्टेक विकण्याच्या तयारीत
– आपला हिस्सा विकून ११०० कोटी रुपये उभे करण्याच्या सरकारचा प्रयत्न

 

नवी दिल्ली : केंद्र सरकार इंटरनॅशनल लिमिटेड या सरकारी कंपनीतील रेल्वेशी संबंधित व्यवसाय करणारी आपली हिस्सेदारी विकत आहे. सरकार इरकॉन मधील ८ टक्कयांपर्यंत स्टेक विकण्याचा विचार करत आहे असल्याचे समोर येत आहे़ सरकार आपला हिस्सा विकून ११०० कोटी रुपये उभे करण्याच्या तयारीत आहे़
ग्किरकोळ गुंतवणूकदारांसाठी इरकॉन मध्ये विक्रीची आॅफर गुरुवार रोजी उघडेल. किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवार रोजी त्यासाठी बोली लावू शकतात. ग्रीनशू पयार्यासह सरकार इरकॉन मध्ये ८ टक्के इक्विटी निर्गुंतवणार आहे, असे ाुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितले़
निर्गुंतवणूक प्रक्रियेदरम्यान सरकार रेल्वे पीएसयू इरकॉनचे ८ टक्के म्हणजेच ७.५३ कोटी इक्विटी शेअर्स किमान १५४ रुपये प्रति शेअर या दराने विकणार आहे. जर सरकारचे ओफएस पूर्णपणे सबस्क्राइब केले तर त्यातून सरकारी तिजोरीत सुमारे १,१०० कोटी रुपये जमा होणार आहेत़ सध्या अभियांत्रिकी आणि बांधकाम रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये सरकारची हिस्सेदारी ७३.१८ टक्के आहे. निर्गुंतवणुकीनंतर सरकारचा हिस्सा कमी होऊन ६५.१३ टक्के होईल असे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले़

Leave A Reply

Your email address will not be published.