छावा संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत आसुड महामोर्चा

मागण्या मान्य न झाल्यास वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा जिल्हाध्यक्ष शिरवत यांचा इशारा

0

छावा संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत आसुड महामोर्चा

मागण्या मान्य न झाल्यास वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा जिल्हाध्यक्ष शिरवत यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकरी व विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी मंगळवार रोजी शहरातील क्रांती चौकापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत आसुड महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांनी केले. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास छावा संघटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार,असा इशारा दिला. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्याने सारा परिसर दणाणून गेला होता.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने काढलेल्या आसुड महामोर्चात शेतकऱ्यांची सरसकट ५ लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांनी पिक काढला होता. मात्र, नुकसान भरपाई मिळालेली नाही. ती रक्कम तात्काळ खात्यावर जमा करण्यात यावी, पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचार त्वरित थांबविण्यात यावा, पाटबंधारे विभागातील अधीक्षक अभियंता समाधान सब्बिनवार व कार्यकारी अभियंता जायकवाडी विभाग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, दोषी असल्यास त्वरीत बडतर्फ करावे, वाळुज येथील गरुड झेप अकॅडमीचा परवाना रद्द करून त्वरित तो क्लासेस बंद करावे, खाजगी कोचिंग क्लासेसवर शासनाने निर्बंध आणावे,पिक विम्यासाठी कार्यरत असलेल्या चोलामंडलम या बोगस कंपनीचा करार रद्द करण्यात यावा या मागण्या केल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने दिले.

वैजापूर तालुक्यातील झालेल्या अनेक बोगस रस्त्यांच्या कामाची चौकशी करा यासह विविध मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न व आसुड महामोर्चा काढण्यात आला होता. विभागीय आयुक्तांना मागण्याचे निवेदन शिरवत यांच्या नेतृत्वात सादर केले. यावेळी विशाल विराळे,जालिंदर एरंडे,मनोहर सनेर,अमोल काळे,किशोर सदावर्ते,विवेक वाकोडे,साईनाथ कडीर्ले, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

कला केंद्राचा परवाना रद्द करा

या आंदोलकांकडून केलेल्या मागण्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणासाठी सर्व बँकांना आदेशित करा, संतांची भुमी असलेल्या पैठण तालुक्यातील आडुळ येथिल कला केंद्राचा परवाना रद्द करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.