महसूल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे नागरिकांचा खोळंबा

काय आहे महसूल कर्मचाऱ्यांची मागणी?

0

महसूल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे नागरिकांचा खोळंबा


काय आहे महसूल कर्मचाऱ्यांची मागणी?


बीड : राज्यभरात दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार आकृतीबंध मंजूर करावा या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून याचा सर्वाधिक परिणाम संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंदमुळे जिल्ह्यातील तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून काम घेऊन येणाऱ्यां अनेक नागरिकांचा खोळंबा होत असून त्यांना अर्थिक भुर्रदंड बसण्यासोबतच वेळ जाताना दितस आहे.

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
महाश्रमदान संकल्पासाठी वृक्ष लागवड करा

जिल्ह्यातील सर्वच महसूल कर्मचारी संपावर असल्याने कार्यालयात रिकाम्या खुर्च्या आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत. जोपर्यंत महसूल विभागाचा आकृतिबंध मंजूर होत नाही तोपर्यंत या संपातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे. या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असून काम घेऊन आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावं लागत आहे.

राज्य सरकारने या मागण्यांवर विचार केला नाही तर बेमुदत कालावधीसाठी संप सुरू राहील असं महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय हांगे यांनी सांगितले.

कॅरीबॅग वापरावर बंदी असताना संभाजीगनरात खुली विक्री
जायकवाडी धरणात 4.13 टक्के पाणीसाठा

काय आहे महसूल कर्मचाऱ्यांची मागणी?


दांगट समितीच्या अहवालांचे पालन करून सुधारित महसूल विभागाचे नमुने लागू करणे आणि महसूल सहाय्यकांना वेतनश्रेणीत १९०० रुपयांवरून २४०० रुपयांवर वाढ देणे या प्रमुख मागण्यांसाठी महसूल विभागातील कर्मचारी संप करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.