बसस्थानक परिसरातील धुळीचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू : सोनवणे
टेंभुर्णी : येथील बसस्थानकाचे काम सुरू असल्याने परिसरात धुळीचे लोट पसरत असल्याने प्रवाशांचा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर तत्काळ उपाययोजना करण्यात अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे महेंद्र सोनवणे यांनी केली आहे.
या परिसराचे काम चालू असल्याने या ठिकाणी सर्वत्र धुळीचे लोट पसरले आहे.तसेच प्रवाशांना सावलीसाठी सोय नसल्याने एस टी बस येईपर्यंत उन्हात ताटकळत बसावे लागत आहे.यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत असून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.लवकरात लवकर पत्रा शेड उभा करून प्रवाशांची उन्हापासून बचाव करावा व दररोज पाणी मारून धुळीपासून बचाव करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.