संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा
-तिन्ही पक्षांकडून मतदारसंघात स्वतंत्रपणे सर्वेक्षण सुरू
संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा
-तिन्ही पक्षांकडून मतदारसंघात स्वतंत्रपणे सर्वेक्षण सुरू
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यात ६ आमदार विजयी झाले होते. मात्र मागील पाच वर्षांत आमदारांचे पक्षांतर आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे उद्धवसेनेसमोर जागा टिकवण्याचे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ग्रामीण भागात काँग्रेसला तीन मतदारसंघांत आघाडी मिळाली आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा केला आहे. यासाठी तिन्ही पक्षांनी मतदारसंघात स्वतंत्रपणे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणानंतरच मविआचे जागावाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
घाटीतील 532, तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर संपावर
अजिंठा बँकेतील घोटाळया प्रकरणातील आरोपी माजी आमदार फरार
सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नये
संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा: महाविकास आघाडीचे जागावाटप हे सर्वेक्षणावरच ठरणार मतदारसंघाचे सांगितले. या जागावाटपात ज्यांचा आमदार सध्या आहे, त्या पक्षाला तो मतदारसंघ मिळणार आहे. मात्र प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्र सर्वेक्षण सुरू असून कोणता पक्ष जिंकू शकतो, याची सध्या चाचपणी सुरू आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या मतदारसंघांत सर्वेक्षणानंतर थोड्याफार प्रमाणात अदलाबदल होऊ शकते असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणूकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला असला तरी उद्धवसेनेचा ६ मतदारसंघांचा दावा कायम आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांत उद्धवसेना पिछाडीवर होती. सध्या उद्धवसेनेचा केवळ कन्नडमध्ये आमदार आहे. मात्र २०१९ मधील जिंकलेल्या जागेच्या सूत्राप्रमाणे उद्धवसेनेकडून ६ विधानसभा मतदारसंघांवर दावा कायम आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिल्लोड, फुलंब्री व पैठणवर काँग्रेसचा दावा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तीन मतदारसंघांत आघाडी मिळाली होती. त्यांना सिल्लोडमध्ये २७,७५९, फुलंब्रीमध्ये २९,८५८ आणि पैठणमध्ये २७८५६ मतांची आघाडी होती. त्यामुळे काँग्रेसने या तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. त्याशिवाय कन्नड, संभाजीनगर पूर्व,संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघांची मागणी काँग्रेसने केली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद कमी आहे. यापूर्वी वैजापूर, पैठण मतदारसंघांतून या पक्षाने विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर पक्षाचा दावा केल्याने हे मतदार संघात नेमके कोणाच्या वाट्याला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.