महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात

-शिवसेनेच्या पैठण, कन्नड मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

0

महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात

-शिवसेनेच्या पैठण, कन्नड मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षात चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्षाने जिल्ह्यातील पैठण आणि कन्नड या उद्धवसेनेच्या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यावरून महाविकास आघाडीत आता कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे.

पैठणमधून माजी मंत्री अनिल पटेल, तर कन्नडमधून माजी आमदार नामदेव पवार या दोन माजी पदाधिकाºयांनी उमेदवारी मागितली आहे. अनिल पटेल माजी मंत्री नामदेव पवार, कन्नड पालकमंत्र्यांच्या पैठणमध्ये काँग्रेसला मताधिक्य प्रत्येक गावात काम केले मविआत सध्या पैठण मतदारसंघ उद्धवसेनेकडे आहे. जालना लोकसभा मतदारसंघात कल्याण काळे यांनी ९५,०१९ मते घेतली होती. त्यांना २७,८५६ मतांची आघाडी मिळाली होती. भाजपचे रावसाहेब दानवेंना ६७,१६३ मते मिळाली होती. यासंदर्भात अनिल पटेल म्हणाले की, पैठण हा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री दानवे पिछाडीवर होते. त्यामुळे पैठण मतदारसंघात काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे मतदारसंघ पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात:
पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ला समजला जातो. माजी मंत्री आणि सध्या छत्रपती संभाजी नगरचे खासदार असलेले संदिपान भुमरे पाच वेळा याच मतदारसंघातून निवडून आले आहे. कन्नड या विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला. यामध्ये शिवसेनेचे उदयसिंग सरदारसिंग राजपूत यांनी १८६९० मतांनी अपक्ष जाधव हर्षवर्धन रायभानजी यांचा पराभव करून जागा जिंकली. तर पैठण हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. यामध्ये २०१९ मध्ये शिवसेनेचे भुमरे संदिपानराव आसाराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय राधाकिसन गोर्डे यांचा १४१३९ मतांनी पराभव करून विजय मिळवला.

पैठण मतदारसंघ शिवसेनेचाच

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड म्हणाले की, पैठण मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच याबाबतचा निर्णय घेतील. काँग्रेसने मागणी केली असली तरी पैठणमध्ये आमचे आमदार निवडून आलेले आहेत. मविआत ही जागा आमचीच आहे.

पवारांना उमेदवारी मिळाल्यास काम करू

कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत म्हणाले की, कन्नड मतदारसंघात मी प्रत्येक गावात काम केले आहे. विकासकामे मोठ्या प्रमाणात केली असून, अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला आहे. त्यामुळे ज्याला उमेदवारी मागायची आहे त्यांनी मागावी. नामदेव पवारांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचे काम करू, असे म्हटले आहे.

महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात

Leave A Reply

Your email address will not be published.