-महंत रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सिटी चौक पोलिस ठाण्यापुढे हजारो नागरिकांचा जमाव
छत्रपती संभाजीनगर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एका धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरसह वैजापूर तथा अहमदनगरमध्येही तीव्र पडसाद उमटले. संभाजीनगर येथील सिटी चौक पोलिस ठाण्यापुढे हजारो नागरिकांचा जमाव जमल्याने या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यावेळी खबरदारी म्हणून या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहे. तसेच मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. यावेळी जमावाने रामगिरीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा?
New Mahindra Thar Roxx SUV With 5-door के फीचर्स जो आपके होश उडा देगी
Mahindra Thar Roxx SUV With 5-door भारतात M&M ने स्वातंत्र्यदिनी लाँच केली
गंगागिरी संस्थान गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आक्षेप घेत नाशिकच्या येवल्यात आंदोलन झाले. यावेळी येवला शहर पोलिस ठाण्यात रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकनंतर छत्रपती संभाजीनगर व जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर या दोन शहरांसह अहमदनगर येथेही त्यांच्या विधानाचे पडसाद उमटल्याने जमावाकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला गेला. यावेळी जलिल म्हणाले की, रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाज कसा वाईट आहे? हे सांगण्यासाठी प्रवचन घेतले होते का? रामगिरींचे विधान एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
शहातील सिटी चौक पोलिस ठाण्यापुढे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास मोठा जमाव जमला. या जमावाने रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव गुन्हा दाखल करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. यावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी खबरदारी म्हणून येथील दुकानदारांनी आपली दुकानेही बंद ठेवली आहे.
वक्तव्य सहन करू शक नाही
यासंदर्भात एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मी आताच पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. त्यांना समाजातील रोष समजावून सांगितला. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनीही या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. आम्ही सर्वकाही सहन करू शकतो, पण पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी त्यांनी जे विधान केले ते सहन करू शकत नाही.