प्रिय बहिण विनेश तू गोल्ड पेक्षा ही खूप काही देऊन गेली आहेस

0

प्रिय बहिण विनेश तू गोल्ड पेक्षा ही खूप काही देऊन गेली आहेस

प्रिय बहिण विनेश….

तू गोल्ड पेक्षा ही
खूप काही देऊन गेली आहेस

एखाद्या गोऱ्या अंगाला पाहून
ऊसाच्या फडात घेऊन जाणाऱ्या
इथल्या वखवखलेल्या नजरा
असणाऱ्या
गिधाडांचा तू डोळा फोडला आहेस

समाजाला घाबरून
पोरीला कोंडून ठेवणाऱ्या

बापाच्या रक्ताला तू आग लावली आहेस

सातच्या आत घरात
असं लिहिलेली ती भिंत
तुझ्या या दणक्याने उद्ध्वस्त केली आहेस

भाकरी थापनाऱ्या
काकन घातलेल्या हाताला
तू कुस्ती खेळायला शिकवलं आहेस

विनेश तू
मीडल पेक्षा ही
या भारताच्या
पिचलेल्या आणि झिजलेल्या
लेकीला
एक नवं आकाश दिलेलं आहे

तू जिद्द दिलेली आहेस
तू हिंमत दिलेली आहेस
आणि इथल्या
नालायक व्यवस्थेच्या
कानाखाली जाळ काढलेला आहेस

सावित्रीच्या हाताने फळ्यावर
गिरवलेल्या त्या पहिल्या अक्षरांना
तू मूठ आवळून
आज मानवंदना दिलेली आहेस…

प्रिय बहिण विनेष
तुला सलाम….

 

कवी नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली.
Mob: 7020909521

Leave A Reply

Your email address will not be published.