कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी आमरण उपोषण

0

कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी आमरण उपोषण

-मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही : राजश्री राठोड

केज : तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावाला मंजुरी द्यावी, या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांचे ३ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे महादेव महाराज चाकरवाडीकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी उपोषणस्थळी भेट देत त्यांच्यासोबत प्रशासनाशी चर्चा करीत प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार सचिन देशपांडे यांनी राठोड यांच्याशी चर्चा करीत जिल्हा जलसंधारण अधिकाºयांशी संवाद साधला. मात्र तलावाच्या मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा राठोड यांनी दिला आहे.

यापूर्वी ग्रामस्थांनी कोरडेवाडी येथील साठवण तलावा संदर्भात लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नसल्याने सरपंच नंदूबाई कोरडे व गावकºयांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. कोरडेवाडी साठवण तलावाचा सर्वे करून २५ वर्षे लोटले तरी आणखी मंजुरी नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीचे सतीश दुनघव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. आता राजश्री राठोड या उपोषण करीत असून महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.