खाते उघडण्यासाठी बँकामध्ये महिलांची गर्दी
– बँकेत कर्मचारी वाढविण्याची महिलांची मागणी
माजलगाव : राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे खाते उघडण्यासाठी शहरातील इंडिया बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पोस्ट आॅफिससह इतर राष्ट्रीयीकृत बँकांत सध्या महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत कर्मचारी कमी असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी महिलांनी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडीसह अनेक ठिकाणी नोंदणी सुरू आहे. सुरुवातीला जुलै महिन्याची नोंदणीसाठीची असलेली मुदत शासनाने वाढवत ३१ आॅगस्ट केली आहे. एक महिन्याला दीड हजार रुपयांचे अनुदान या योजनेतून महिलांकरिता देण्यात येणार आहे. माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. योजनेपासून वंचित राहू नये यासाठी बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत असून सध्या बँकांत अपुरे मनुष्यबळ असून असे खाते उघडण्यासाठी होत असलेल्या गदीर्मुळे बँकांतील इतर कर्मचाºयांना मोठा ताण वाढत असून कर्मचाºयांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी होत आहे. याशिवाय बँकेत इतर व्यवहार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने बँकेतील कर्मचाºयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यामध्ये आम्ही महिलांचे बँक खाते उघडण्याचे काम करत आहोत, असे एसबीआयचे शाखा व्यवस्थापक-पंकज कुमार म्हणाले.
स्वतंत्र टेबलची व्यवस्था करा
बँकेने खाते उघडण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने खाते उघडण्यासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली पाहीजे. याशिवाय बँकेत कर्मचारी वाढवण्याची गरज आहे. बँकेत येणाºया महिलांना त्रास होणार नाही तर त्यांना खाते उघडण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया शेतकरी नेते नारायण गोले यांनी दिली आहे.