दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय
-सुविधा पुरविण्याची ग्रामस्थांकडून मागणी
शिरूर कासार : शहरातील सिंदफणा नदी काठावर असलेल्या सिद्धेश्वर संस्थानाच्या जवळ दशक्रिया विधी करीत आहेत. सध्या या ठिकाणी होणाऱ्या दशक्रिया विधीच्या संख्येत वाढ झाली असली तरी सुविधां अभावी भाविकांची मोठी गैरसोय होत असल्याने याठिकाणी सुविधा पुरविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सिंदफणा नदी पात्राच्या बाजूला सिद्धेश्वर संस्थान असून याठिकाणी दशक्रिया विधी पार पडत असतात. मात्र या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. याठिकाणी असणारे अस्वच्छ नदीपात्र, दशक्रिया विधी साठी लागणारे पाणी व विधी वेळी बसण्यासाठी जागा नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे प्रशासनाने दशक्रिया विधी ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बीड शहरातील कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य
लाडक्या बहिणींची मते फिक्स करण्यासाठी खटाटोप?
मराठा विरूद्ध मराठेत्तरांमध्ये आग लावू पाहणा-या कपटी वृत्तीला पुणेकरांकडून थोबाडीत – अभिनेते किरण माने
दशक्रिया विधीसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यामुळे माजीमंत्री सुरेश धस यांच्याकडे पाठपुरावा करून नगरपंचायत प्रशासनाने सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ दशक्रिया विधी घाटासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून मागील दोन वषार्पासून या दशक्रिया विधी घाटाचे काम रखडलेले आहे. सध्या या कामाला नगरपंचायत प्रशासनाने सुरुवात केली आहे. परंतु काम संथ गतीने होत असल्याने गैरसोय होत आहे.
घाटाचे काम मार्गी लावण्याचे आदेश
शिरूर नगरपंचायत ला माजी आमदार सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु विरोधकाकडून शहरातील सुरू असलेली विकास कामे वाढवण्याच्या तक्रारी झाल्यामुळे कामे रखडली होती यामध्ये दशक्रिया विधी घाटाचे काम देखील रखडले होते परंतु सर्व अडचणी दूर करून सुरेश धस यांनी शहरातील दशक्रिया विधी घाटाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत, असे नगर पंचायत गटनेते गणेश भांडेकर यांनी सांगीतले.