डॉ. ज्योती मेटे यांनी घेतली जिल्हाधिकारी पाठक यांची भेट

-शहरातील समस्यांचा सोडविण्याची विनंती

0

डॉ. ज्योती मेटे यांनी घेतली जिल्हाधिकारी पाठक यांची भेट

-शहरातील समस्यांचा सोडविण्याची विनंती

बीड : शहरात नागरी समस्यांचा आणि इतर जे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये रस्ते, अस्वच्छता आणि पाणी पुरवठ्यातील विस्कळीतपणामुळे यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रस्त होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे यासाठी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी बुधवार रोजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. यावेळी या समस्याकडे लक्ष देऊन त्या सोडविण्याची विनंती केली.

शहरातील समस्या जिल्हाधिकारी पाठक यांच्यासमोर मांडताना डॉ. ज्योती मेटे यांनीनगर पालिकेच्या दुर्लक्षीत पणाकडेही त्यांचे लक्ष वेधले. यामध्ये रस्त्यांची दयनिय अवस्था, अनेक भागात निर्माण झालेला स्वच्छतेचा प्रश्न याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे, असे डॉ. मेटे यांनी म्हटले.

यावेळी डॉ. ज्योती मेटे यांच्यासोबत अनिल घुमरे , सुहास पाटील, नवनाथ प्रभाळे, मनोज जाधव, बाळासाहेब मस्के, पंडित शेंडगे, नामदेव धांडे, सुनील थोरात, हरीश शिंदे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.