ज्ञानराधा बँकेच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा
-पथकाकडून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपच्या आडचणीत वाढ झाली आहे. यामध्ये कुटे यांच्या संभाजीनगरातील ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या गारखेड्यातील विभागीय कार्यालयावर शुक्रवारी ईडीच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पथकाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या बँकेकडे राज्यभरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेले असून या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी सुरेश कुटे यांच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल असून सध्या तो तुरुंगात आहे.
मुख्यमंत्री यांच्या कृतज्ञता सोहळ्याची आंबेडकरी समाजाकडून घोषणा
प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने शहराला मनस्ताप
महावितरण ऑफिसला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुलूप
शहरातील ज्ञानराधा पतसंस्थेच्या कार्यालयात ईडीच्या ६ अधिकाºयांनी जाऊन तेथील कागदपत्रांची तपासणी केली. याच इमारतीत असलेल्या तिसºया मजल्यावर असलेल्या विभागीय कार्यालयातील दस्तऐवज, संगणक, इतर गोष्टींची तपासणी केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी कुटेवर दाखल झालेले गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक अवचार स्थानिक कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान सहभागी होते. सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि आशिष पाटोदकर यांची आतापर्यंत ५ हजार ७६५ कोटी २४ लाख २० हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे द्यावेत यासाठी एमपीआयडी कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
ठेवीदारांनी बँकेकडे धाव
मागील अनेक महिन्यांपासून ज्ञानराधाची शाखा बंद असली तरी शुक्रवारी बँकेचे गेट उघडे दिसल्याने काही ठेवीदारांनी तिकडे धाव घेतली. यावेळी ठेवीदारांनी पैसे मिळायला सुरुवात झाली का? अशी विचारणा केली. त्यावेळी या ठिकाणी कारवाई सुरू असल्याचे बाहेर उभ्या असलेल्या अधिकाºयाने दिले. काही ठेवीदारांनी आपले पैसे अडकल्याचे सांगितले.
ठेवीदारांच्या बाजूने न्यायालयात लढा
ईडीच्या अधिकाºयांची आम्ही भेट घेतली. आमची मदत लागेल का, अशी विचारणा केली. त्यांनी नको म्हटले. ते दस्तऐवजाची पडताळणी करीत आहोत. आम्ही ठेवीदारांच्या बाजूने न्यायालयात लढा देत आहोत. त्यात काही आढळून आल्यानंतर आम्ही स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करू, असे ठेवीदारांचे वकील अॅड.अविनाश औटे म्हणाले.