विद्यमान आमदारांकडून खोट्या विकासकामांच्या घोषणा
-माजी मंत्री सुरेश धस यांचा आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर निशाणा
विद्यमान आमदारांकडून खोट्या विकासकामांच्या घोषणा
-माजी मंत्री सुरेश धस यांचा आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर निशाणा
कडा : कोरोनाकाळात मृत्यूची सर्वाधिक संख्या आमदारांच्या शिराळ गावची होती. अशा संकटात आमदार आपले गाव सांभाळू शकले नाहीत. आता निवडणुका जवळ आल्यावर खोट्या विकासकामांच्या घोषणा ते करत असल्याचा आरोप माजी मंत्री सुरेश धस यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, माझा मतदारसंघ, माझे नातेवाईक याप्रमाणे फक्त पुतण्या, जावई आणि मेहुणा यांनाच विकासकामे देऊन आपला आणि आपल्या कुटुंबांचा विकास विद्यमान आमदारांनी साधला म्हणत त्यांनी आष्टीच्या विद्यमान आमदारावर टीका केली.
तालुक्यातील कडा जिल्हा परिषद गटात माजी मंत्री सुरेश धस यांनी जनसंवाद दौरा केला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस सभापती रमजान तांबोळी, संदीप खाकाळ, सरपंच पाटील, जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे, संजय आजबे आदी उपस्थित होते.
संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा
घाटीतील 532, तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर संपावर
अजिंठा बँकेतील घोटाळया प्रकरणातील आरोपी माजी आमदार फरार
सध्याच्या आमदारांकडून नातेवाइकांचा विकास
यावेळी माजी मंत्री धस म्हणाले, मी १९९९ ला आमदार झाल्यानंतर आमच्या घरची गुत्तेदारी बंद झाली. गुत्तेदारीचे रजिस्ट्रेशनसुद्धा रद्द झाले हे मी सांगतो. परंतु मतदारसंघात पेव्हर ब्लॉक, सिमेंटही तुम्ही सांगाल तिथूनच विकत घ्यायचे असे चालले आहे. सध्याचे आमदार नातेवाइकांचा विकास करत आहेत.