हिरव्या मिरचीचे दर घसरल्याने शेतकºयांना आर्थिक फटका
सिल्लोड : तालुक्यातील आमठाणा, सावखेडा फाटा येथील ठोक बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर कमी झाले आहेत. या दरामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. मिरची पीक आता उपटून टाकले जात आहे.
यावर्षी तालुक्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात हिरवी मिरची दाखल झाली. यामध्ये एका शेतकºयाला एकरी लागवड खर्च ८० हजार ते एक लाख रुपये लागला आहे. एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या मिरचीचा दुसरा तोडा सुरू असून सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आता मात्र बाजारपेठेत दररोज मिरचीचे दर घसरल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे.
सरकारची गुलामगिरी आमच्या रक्तात नाही – प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ
बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकुन निषेध
संभाजीनगरात सिग्नल, आस्थापना आणि कार्यक्रमांमध्ये भीक मागण्यास मनाई
हिरव्या मिरचीचे दर पडल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला आठ ते दहा हजार रुपयांचा भाव मिरचीला मिळत होता. परंतु सध्या मिरची पीक खराब झाले आहे. त्यातच मिरचीला वीस ते पंचवीस रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकºयांसाठी या वर्षी मिरची पीक शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यावेळी मिरची उत्पादक विकास मोरे म्हणाले की, आम्ही चार एकर मिरची लागवड केली होती. आमचा खर्चसुद्धा निघाला नाही. मिरची पिकाला महागडी खते, औषध फवारणीसाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे मिरची पीक पुरेनासे झाले आहे. आम्ही घरातील सर्व पैसे शेतांत टाकून कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे आम्ही मिरची उपटून टाकत आहोत.
पाऊसामुळे मिरचीचे दर घसरले
आता सध्या गुंटूर मिरचीला मागणी नसल्याने भाव कमी झाले आहेत. मुंबई, वाशी, पुणे आदी ठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे मिरचीचे दर घसरले आहेत, असे मिरची व्यापारी राजूसेठ यांनी सांगितले.
खर्च वाढल्याने आडचणीत सापडलो
शेतकºयांना मिरची लागवड करण्यासाठी एका एकरसाठी अंदाजे ८० हजार ते एक लाख रुपये खर्च येतो. यात एक किलो मिरची तोडण्यासाठी ८ रुपये मजुरी द्यावी लागते. यंदा तोडणी, वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत, असे शेतकरी काशिनाथ सोमासे म्हणाले.