पिकावरील बुरशी प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त
-कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
माजलगाव : लिंबागणेश परीसरात आठवडाभरापासून पाऊस असला तरी ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापुस, तुर,उडीद, मुग या पिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पिक रोगांवरील किड व रोग पाहणी आणि संरक्षण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात यावे अशी मागणी डॉ.गणेश ढवळे व शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना किड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
हे पण वाचा
लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र
खाते उघडण्यासाठी बँकामध्ये महिलांची गर्दी
कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.श्रीकृष्ण झगडे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पिकांवरील किड व रोग पाहणी करत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ.श्रीकृष्ण झगडे यांनी सोयाबीन पिक संदर्भात मार्गदर्शन करताना ज्या ठिकाणी पाणी जमिनीत साचुन राहते त्याठिकाणी झाडांची मुळे जमिनीतुन अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया बंद पडते.
कामगंध सापळ्यांचा वापर करा
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उपाययोजना सांगताना सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत अशा ठिकाणी फेरस सल्फेट (विद्राव्य) ५० ग्राम + १९:१९:१९ (विद्राव्य) १०० ग्रम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. उंट अळी, केसाळ अळी, लष्करी अळी या प्रकारच्या अळी वर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा सर्वेक्षणासाठी वापर करावा.
लागोपाठ फवारणीसाठी वापरू नका
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसण केले. यावेळी शेतकऱ्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन केले गेले. फवारणी करताना एकच किटकनाशक लागोपाठ फवारणीसाठी वापरू नये. किटकशाशकांची आलटुन पालटुन फवारणी घ्यावी असे सांगितले.