कलम 370 च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दहशतवादी हल्ल्यांची भीती

0

कलम 370 च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दहशतवादी हल्ल्यांची भीती

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून आज ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१९ मध्ये याच दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले होते. राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. कलम 370 रद्द केल्याच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा दलांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची भीती आहे.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी दावा केला की, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पक्षाचे कार्यालयही बंद करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्राही एक दिवसासाठी थांबवण्यात आली. जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्पमधून अमरनाथ यात्रेकरूंच्या एकाही तुकडीला काश्मीरला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यंदा अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू झाली असून ती १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

अपनी पार्टीचे कार्यालय बंद

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशिवाय अल्ताफ बुखारी यांचे अपनी पार्टीचे कार्यालय खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी मुख्य प्रवक्ते तन्वीर सादिक हे दावा करताना म्हणाले की, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.