मराठवाड्यासाठी कोकणातून पहिल्या टप्प्यात ५५ टीएमसी पाणी देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

योजनेसाठी १६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

0

मराठवाड्यासाठी कोकणातून पहिल्या टप्प्यात ५५ टीएमसी पाणी देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

योजनेसाठी १६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी कोकणातून पहिल्या टप्प्यात ५५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या योजनेसाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे ४ वर्षे लागतील. सरकार या योजनेची अंमलबजावणी करतील, अशी अपेक्षा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी व्यक्त केली.

जायकवाडीचे पाणी नगर व नाशिकच्या धरणांनी अडवले आहे. त्यात मराठवाडा उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोडतो. पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नेहमीच गंभीर स्वरूप धारण करतो. मराठवाड्यातील सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे सिंचन अनुशेष ४२ हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. सिंचन, पिण्याचे पाणी, उद्योग, व्यवसाय आदींची गरज भागवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानने २३८ टीएमसी पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. शंकर नागरे, जयसिंग हिरे, अरुण घाटे, सजेर्राव वाघ, महेंद्र वडगावकर यांनी तो मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला. पाणी कोठून, कसे व किती आणता येईल याची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात कोकणात १५५ पैकी ५५ टीएमसी पाणी आणण्यासाठी मंजुरी दिली. आॅगस्टमध्ये प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. सरकारने सकारात्मक एक पाऊल पुढे उचलून ५५ टीएमसी पाणी आणण्यासाठी निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत. मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा आहे. तसेच पाण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत सरकारकडे सातत्याने पाठपुरावाही करावा लागणार आहे, असे मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान चे सदस्य महेंद्र वडगावकर म्हणाले.

सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचे निश्चित

जायकवाडीत आणणे व छत्रपती संभाजीनगर व जालना, अंशत: बीडसाठी उपलब्ध करून देणे तसेच कृष्णा खोºयातून ५१ टीएमसी आणले जाणार असून धाराशिव, लातूर आणि अंशत: बीडला पाणी आणण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय विदभार्तून ३२ टीएमसी पाणी येलदरी व पैनगंगा धरणात आणणे व हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्याला उपलब्ध करून सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती अधिकाºयांनी दिली आहे.

समिती स्थापन केली जाणार

गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे. समितीत मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचा एक सदस्य असेल. ही समिती कोकण, विदभार्तून पाणी आणण्यासाठी काम करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.