कन्नड शहरात ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा
कन्नड : सध्या जिल्ह्यात ई-पॉस मशीनचा मुद्दा जारे धरू लागला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या ई-पॉस मशीन सुरळीत चालत नसल्याच्या पार्श्वभूमीवर धान्य दुकानदारांनी शहरात ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून आंदोलन केले.
कन्नड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ई.पॉस मशीनची अंत्ययात्रा काढली. यावेळी तालुकाध्यक्षा सुनीता कदम, कादर खान, सय्यद रऊफ अकबर, शिवाजी गावंडे, भाऊसाहेब गोलाईत, रघुनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेनंतर मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. एकनाथ जाधव, कैलास गायकवाड, दिगंबर पवार, कैलास पवार आदींची उपस्थिती होती.