देशातील अनेक मंदिरांमध्येही सोन्याचा घोटाळा
-शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद जी महाराज यांचा दावा
नवी दिल्ली : ज्योतिर्मय मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद जी महाराज यांनी १० दिवसांपूर्वी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथमधून २२८ किलो सोन्याची चोरी झाल्याचा खुलासा केला होता. त्यात पुन्हा एकदा मोठा दावा करताना ते म्हणाले की, केवळ बाबा केदारनाथ धाममध्येच नाही तर बाबा विश्वनाथसह देशातील इतर अनेक मंदिरांमध्येही सोन्याचा घोटाळा झाला आहे.
सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली तर भारताला ८२ वे स्थान
अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले
अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले
यावेळी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोणते सोने आहे, जे 6 महिन्यात पितळेचे झाले. देवाची फसवणूक झाली असेल तर ती पुढे यावी. यावर पंतप्रधान अजून बोलले नाहीत, पण एक वेळ येईल, त्यांना बोलावेच लागेल. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करत आहोत. परंतु आम्हाला आरोपी बनवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवाशी काही फसवणूक झाली असेल तर ती समोर यावी. कारण लक्ष वेधूनही समित्या चौकशी करायला तयार नाहीत.
अविमुक्तेश्वरानंद सर्वश्रेष्ठ गुरू
काशी विश्वनाथ धाम मंदिराचे सीईओ विश्वभूषण मिश्रा म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद अलीकडे मंदिरात आले नाहीत. ते सनातन धर्माचे सर्वश्रेष्ठ गुरू आहेत, हे कदाचित त्यांना दिव्य दृष्टीतून कळले असावे. ५ वेळच्या आरतीच्या वेळी या भिंती देखील काजळीने झाकल्या जातात. साफ केल्यानंतर सोने पूवीर्सारखे चमकू लागते.
अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले
लाडकी बहीणच्या नोंदणीसाठी तीन दिवसीय शिबिर
चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला