आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला राज्य शासनाकडून तत्त्वत: मंजुरी

-प्रस्ताव तातडीने क्रीडा विभागास सादर करण्याचे पालकमंत्री सत्तार यांचे आदेश

0

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला राज्य शासनाकडून तत्त्वत: मंजुरी

-प्रस्ताव तातडीने क्रीडा विभागास सादर करण्याचे पालकमंत्री सत्तार यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिल्याने याबाबतचा प्रस्ताव तातडीने क्रीडा विभागास सादर करण्याचे आदेश पालकमंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या वेळी आमखास मैदानाच्या जागेवर जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. गारखेडा विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. शहरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यश मिळवता यावे, यासाठी उचित प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सत्तार म्हणाले.

मैदान वक्फ बोर्डाच्या मालकीचे

स्मार्ट सिटी कार्यालयाच्या बाजूस असलेले हे मैदान वक्फ बोर्डाच्या मालकीचे आहे. ही जागा सुमारे २९ एकरांची आहे. फुटबॉलपटू मोठ्या संख्येने इथे सराव करत असतात. काही राजकीय सभाही इथे होत असत पण आता स्टेडियमसाठी जागा राखीव झाल्यावर सभांना बंदी केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.