बीडमध्ये शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी

0 175

बीडमध्ये शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी

 

बीड : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष ज्या सभेकडे लक्ष लागलं होत ती म्हणजे बीड येथे होणारी महाप्रबोधन सभा. या सभेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थित राहणार असल्याने जिल्हाभरातील कार्यकर्ते दुपारपासूनच बीडच्या दिशेने निघाले होते.

बीड येथिल माने काॅम्प्लेक्स मध्ये शिवसेना बीडच्या वतीने महाप्रबोधन सभेचं आयोजन केलं होतं ती सभा पार पडली. मात्र ही सभा सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे व भाजप समर्थकांनी कोप-यात उभे राहून रिकाम्या खुर्च्याचे फोटो काढून ते सोशल मिडीयावर शेअर करत ही सभा फ्लॉप झाल्याची टिप्पणी केली. भक्तांची पोस्ट केल्यास नेते तरी कसे शांत राहतील त्यांनीही तोच कित्ता गिरवत हास्यास्पद कॅप्शन देऊन पोस्ट केली. त्यात आघाडीवर होते ते भाजपचे नितेश राणे यांनी देखील या फोटोला ट्विट करत शकुनी मामांचा बीडमध्ये फ्लॉप शो असं ट्विट केल. त्याचबरोबर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील ट्विट करत ते फोटो पोस्ट केले. त्यामुळे भक्त आणि त्यांच्या नेत्यांचे बालीस चाळे समोर आले आहेत.

दुसरीकडे मात्र शिवसेना बीडच्या पदाधिकारी यांना अपेक्षित संख्येपेक्षा जास्त पटीने लोक उपस्थित असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी
सभा सुरू झाल्यानंतर सभा स्थळावर जी परिस्थिती आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्यात माने काॅम्प्लेक्सचे मैदान खचाखच भरल्याचे दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये एकही खुर्ची रिकामी दिसत नाही. त्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ही उपस्थित असल्याने त्यांनीही या सभेत अपेक्षापेक्षा जास्त गर्दी असल्याची माहीती दिली.

सुषमा अंधारे यांच्या होमपिचवरून त्यांच्या बदनामीचा प्रकार घडवण्याचा प्रकार झाला होता. मात्र त्यांना धडा शिकविण्याच काम या महाप्रबोधन सभेतून सुषमा अंधारे व शिवसेना बीडच्या पदाधिकारी यांनी केलं. या सभेतून सुषमा अंधारे यांनी भाजपाचे वाभाडे काढून यात लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी सरकार आणि मोदींनी निवडून येताना जनतेला काय काय आश्वासन दिली होती याचे व्हिडिओ उपस्थितांना दाखवून या भाजपाचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आणण्याचं काम केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.