आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का? – मनोज जरांगे पाटील

- मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्थापित उमेदवारांना इशारा

0

आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का? – मनोज जरांगे पाटील

– मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्थापित उमेदवारांना इशारा

जालना : मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू करत मनोज जरांगे पाटील आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा नवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची संख्या जवळपास ७०० ते ८०० आले आहेत, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. या अर्जांमध्ये गोरगरीब तसेच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये काही प्रस्थापितांनीही अर्ज दाखल केले आहेत. यावेळी जरांगे यांनी आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का? असा इशारा दिला आहे.

आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्याकडे प्रस्थापितांचे तसेच राजकीय ताकद असलेल्या उमेदवारांचे देखील अर्ज आले आहेत. अशा लोकांसाठी मनोज जरांगेंनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का? अशा शब्दात त्यांनी प्रस्थापितांना सुनावले आहे. आता अंतरवालीसराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळत आहे.

मराठा आरक्षणाच्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. लढायचे की पाडायचे? यावर येत्या २९ ऑगस्ट रोजी निर्णय घेण्यात येणार होता, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे.

गरीब पोरांचे भलं करायचे आहे

मी चार वेळा निवडून आलो, मी पाच वेळा निवडून आलो म्हणून मला उमेदवारी द्या, हे आता चालणार नाही. आम्हाला आमच्या समाजातील गरीब पोरांचे भलं करायचे आहे. कोणी म्हणतो मी याला नोकरी लावली, त्याला शाळेवर लावले, पण या सगळ्यांना सांगायचे आहे की, तुम्ही समाजावर उपकार केलेले नाहीत. तो कष्ट करतो म्हणून तुम्ही त्याला कामावर लावले आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.