कोरोनिलबाबची टीपण्णी मागे घेण्याचे उच्च न्यायालयाचे पंतजलीला आदेश

- रामदेव बाबाच्या आडचणीत वाढ

0

कोरोनिलबाबची टीपण्णी मागे घेण्याचे उच्च न्यायालयाचे पंतजलीला आदेश

– रामदेव बाबाच्या आडचणीत वाढ

नवी दिल्ली : पतंजली आणि बाबा रामदेव यांच्याविरोधात अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवार (२९ जुलै) रोजी निकाल दिला. यावेळी न्यायमूर्ती अनूप भंभानी यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव यांना ३ दिवसांच्या आत त्यांची टिप्पणी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात त्यांनी पतंजली आयुर्वेदाचे कोरोनिल हे केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे नसून कोविड-१९ बरा करणारे औषध असल्याचे म्हटले आहे. यामुळे रामदेव बाबाच्या आडचणीत वाढ झाली आहे.
न्यायमूर्ती भंभानी म्हणाले, मी पतंजली, बाबा रामदेव आणि त्यांच्या प्रवर्तकांना काही ट्विट ३ दिवसांत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. जर ते तसे करण्यात अयशस्वी झाले तर सोशल मीडिया मॉडरेटर हे ट्विट काढून टाकतील. पतंजलीच्या दाव्याच्या संदर्भात विविध मीडिया प्लॅटफॉर्मवरून कोरोनिलशी संबंधित विधाने काढून टाकण्याची अंतरिम मदत डॉक्टरांनी मागितली होती. उच्च न्यायालयाने २१ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.
डॉक्टरांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले की, रामदेव यांनी कोरोनीलला कोविड औषध म्हणत अनेक दिशाभूल करणारे दावे केले आहेत. तर त्यांना केवळ इम्युनो-बूस्टर होण्यासाठी कोरोनिलचा परवाना मिळाला. पतंजली आयुर्वेद आणि बाबा रामदेव यांना भविष्यात अशी वक्तव्ये करणे बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉक्टरांच्या वकिलांनी केली होती. कोरोना महामारी दरम्यान बाबा रामदेव म्हणाले होते की पतंजली आयुवेर्दाचे कोरोनिल हे केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे नाही तर कोविड -१९ बरा करण्यासाठी एक औषध आहे. याबाबत डॉक्टर्स असोसिएशनने २०२१ मध्ये बाबा रामदेव, त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती.

१४ उत्पादनांची थांबवली विक्री

पतंजली आयुर्वेद लिमिटेडने ९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाला माहिती देताना आपण १४ उत्पादनांची विक्री थांबवली असल्याचे सांगितले होते. उत्तराखंडने एप्रिलमध्ये या उत्पादनांचे उत्पादन परवाने निलंबित केले होते. ही माहिती पतंजलीच्या दिशाभूल करणाºया जाहिरात प्रकरणाशी संबंधित होती. आयएमएने पतंजलीविरोधात हा खटला दाखल केला होता.
Leave A Reply

Your email address will not be published.