पुरोगामी विभुतीच्या सांगोल्यात खुज्या विचाराचं बांडगूळ उगवलं…

0 246

पुरोगामी विभुतीच्या सांगोल्यात खुज्या विचाराचं बांडगूळ उगवलं…

 

भाई आकाश निर्मळ
मध्यवर्ती कमेटी सदस्य
भारतीय शेतकरी कामगार पक्ष

 

महाराष्ट्रात जसे दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भ भाग आहेत तसाच आणखी एक पश्चिम महाराष्ट्रातील १३ तालुक्यांचा भाग आहे त्या भागाला “माणदेश” या नावाने संबोधले जाते त्याच माणदेशातील “सांगोला” हा एक तालुका कायम दुष्काळाच्या छत्रछायेखाली असलेला तालुका पण माणदेशातील ईतर तालुक्यापेक्षा इथे एक अपवादी नेतृत्व उदयास आले त्या नेतृत्वाने केलेल्या अहोरात्र परिश्रमाने टेंभू-म्हैसाळचे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीला मिळवुन दिले व सांगोला तालुका सुजलाम सुफलाम झाला आज या तालुक्यातील डाळींब विदेशा निर्यात केले जातात म्हणून तेथील जनतेने त्या त्या नेतृत्वास ११ वेळा विधानसभेवर निवडून पाठवले व आपल्या आमदाराचे व आपल्या तालुक्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदवले ते आपल्या एकनिष्ठता, साधी राहणी उच्च विचारसरणी व एका सर्वसाधारण लहान मुलांना सुद्धा ते कधी आरे कारे बोलले नाहीत किंवा कुठलेही विधीमंडळ अधिवेशनाच्या रेडीओ व टि व्ही वर बातम्या सुरू झाल्या तर त्यांच नाव घेतल्याशिवाय कोणत्याही माध्यमाचं बातमीपत्र पूर्ण होत नव्हतं हे उभ्या महाराष्ट्राला ऐकले आहे, पाहिले आहे आहे त्या विभूतीचे नाव म्हणजेच आदरणीय भाई गणपतराव देशमुख (उर्फ आबासाहेब) कारण असे की ते प्रत्येक प्रश्न सर्वसामान्य जनतेचा हितासाठी अभ्यासपूर्ण व पोटतिडकीने प्रश्न मांडत होते नुसता मांडत नव्हते तर तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडून प्रश्न सोडवून घेत होते हि त्यांची खास कसबच! त्यांचे विधी मंडळातील भाषण ऐकायला प्रत्येक वेळेस तत्कालीन दस्तुरखुद्द विधानसभा सभापती, मुख्यमंत्री कानात जीव ओतून ऐकायला आवर्जून उपस्थित रहात असतं. महाराष्ट्र राज्यात सांगोला मतदारसंघाची मान कायम एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम भाई देशमुखांनी उभ्या ह्यातीत केले. पण मागच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आबासाहेबांचे वय वर्षे ९२ झाले होते म्हणून ते म्हणाले मला स्पष्ट दिसत व ऐकूही येत नाही. मग मी निवडणूक जिंकून काय करु?
त्यावेळी कार्यकर्त्यांनी अक्षरशः आबासाहेबांच्या पायावर डोके ठेवून लोटांगण घेतले होते की एवढी निवडणूक तुम्हीच लढवा पण लोकांचा आग्रह मानतील ते आबासाहेब कसले! ते स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिले.
घराणेशाही नको म्हणून आबांनी भाई भाऊसाहेब रुपनर नावाचा उमेदवार जाहीर केला होता पण रुपनरांना मतदारसंघातून सर्वसामान्य जनतेचा प्रचंड विरोध होत होता व तक्रारी वाढत होत्या म्हणून रुपनरांच्या विरोधातला सर्व सामान्य जनतेचा रोष पाहून आबासाहेब जनतेलाच म्हणाले आता तुम्ही सांगाल तो उमेदवार मी जाहीर करतो तुम्ही नाव सुचवा माझी काही हरकत नाही. सामान्य जनतेतील उच्च शिक्षित, गोर-गरीब, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर तरुणांनी डॉ. अनिकेत चंद्रकात देशमुख हे सुचवले आबासाहेब म्हणाले अनिकेतला अजून राजकारणाचा अनुभव कुठे आहे तो अजुन शिक्षण घेत आहे त्याला जमणार नाही. पण तालुक्यातील तरुणांच्या उत्साह व रेट्यामुळे आबासाहेबांना हा उमेदवार नाईलाजाने मान्य करावा लागला या निवडणुकीच्या अवघ्या दहा दिवस अगोदर पुण्यातुन वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) सुरु असताना अनिकेतला मतदारसंघात आणल्या गेले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अगोदर घोषित झालेले भाऊसाहेब रुपनरांचा राग अनावर झाला व ते चिडून शिवसेनेच्या तंंब्बुत गेले ईकडे महाविकास आघाडीच्या घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिपकआबा साळुंखेंना उमेदवारी देऊन बंडखोरी केली होती पण गोर-गरीब जनता व तरुण ईर्षेने पेटून भाई अनिकेत देशमुखांच्या पाठीशी उभे होतेच नव्हे तर त्यांनी स्वतः खर्चाने संपूर्ण निवडणूक हातात घेतली होती.
हे सर्व असं घडत असताना तिकडे बरेच पक्ष बदलत शिवसेनेत आलेल्या “काय डोंगार काय झाडी काय हाटील फेम” शहाजीबापू पाटलांची उमेदवारी सेनेने जाहीर केली होती आणि त्यांच्या मदतीला शेकापचे अगोदरचे जाहीर केलेले उमेदवार रुपनर तर जगजाहीरच होते परंतु राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार असलेले साळुंखे
महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शेकापच्या अनिकेत देशमुखांना जाहिर पाठींबा देऊन अंधारातून शहाबापुंच्या मदतीला धावून जात होते!
कारण त्यांना माहीत होते की शहाबापु निवडून आले तर पुढच्या निवडणूकीत हरवायला सोपे जाईल पण अनिकेत सारखा उच्च शिक्षित नवतरुण उमदा उमेदवार निवडून आला तर पुन्हा आबासाहेबांसारखे पुढचे ५० वर्षे आपली डाळ शिजवून देणार नाही!
या निवडणूकीत अनिकेतने व मतदार संघातील शेकापच्या गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी नवतरुण कार्यकर्त्यांनी शहाबापु व त्यांच्या चेल्या चपट्यांना पळता भुई थोडी केली होती पण जिथे घरभेदी व बरोबरचा कपटी मित्रपक्षच विरोधात जातात तिथे हार पत्करावीच लागते तसेच इथे पण झाले!
तसेच भाई अनिकेतच्या बाबतीत झाले. सेनेच्या शहाबापु पाटलांना ९९४६४ मते मिळाली तर शेकापच्या भाई अनिकेतला ९८६९६ मते मिळाली व अवघ्या ७६८ मतांनी पराभव पत्करावा लागला पण परभवा नंतर मतदारसंघातील नव तरुण व गोर-गरीब मतदार ईर्षेने पेटून उठला तो आजतागायत तसाच पेटलेला आहे पुढच्या वेळी तालुक्यातील सुज्ञ नवतरुण, जनता वचपा काढल्या शिवाय रहाणार नाही. पण हा सर्व ऊहापोह यासाठी आहे कि १९९५ ला पण हे शहाबापु पाटील तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात अवघ्या १९२ मतांनी भाई गणपतरावांच्या विरोधात आय कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
तेव्हा शेकापचे कार्यकर्ते बोलत होते आबासाहेब आपण फेर मतमोजणी केली पाहिजे कारण तेव्हा मतदान पत्रीका होत्या पण मोठ्या मनाचे आबासाहेब म्हणाले नको त्यांना जनतेने संधी दिली आहे.
आपण एवढे पाच वर्षे बघू त्यांची कामाची पद्धत बघु नंतर एका तालुक्यातील विवाह सोहळ्यात आबासाहेब आणि शहाबापु आजुबाजुला बसलो होते तर बापूंनी मद्यप्राशन केल्याचे आबासाहेबांना उग्र वास आला तेव्हा बोलले की बापु तुम्ही आता दिवसा मद्यप्राशन करत जाऊ नका तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात तर हे आमदार महाशय म्हणाले की आबासाहेब मला तुमच्यामुळेच दिवसा दारू प्यावी लागते!
सन १९९८ ला आमदार शहाबापु असताना असा त्यांनी असा एक कु-कारनामा केला होता कि पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली झुकवावी लागली होती तो कु-करारनामा म्हणजे असा हा शहाबापु आमदार असताना खाकी ड्रेस घालून तोतय्या पोलीस बनून अहमदनगर शहरातील एका सुसज्ज हॉटेल मालकाला खंडणी मागण्यांसाठी पठ्ठ्या गेला होता पण तो हॉटेल मालक अतिशय चतुर निघाला त्यानी याला बरोबर हेरले आणि खंडणी देतो पण आता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून हॉटेलमध्ये बसा मी पैसे मागवून घेतो म्हणून ओरीजिनल पोलीसांना बोलवून ह्या शहाबापुला पोलीसांच्या ताब्यात दिले होते व तेव्हा आमदारकी पण रद्द झाली होती. या बाबत प्रश्न आजपर्यंत या महाशयांना कोणत्याही न्युज चॅनेलवाल्यांनी मुलाखती दरम्यान हा प्रश्न विचारलेला नाही म्हणजे जरा पेडच मुलाखती वाटतात!
शहा-बापुंचा आजपर्यंतचा नाट्यमय राजकीय प्रवास प्रवास असा पुढील प्रमाणे प्रथम आय काँग्रेस नंतर त्यावेळेस सुशीलकुमार शिंदेंना नेता मानायचे शिंदे साहेब मला मुलाप्रमाणे वागणुक देतात असे ते ठिकठिकाणी आवर्जून उल्लेख करायचे कालांतराने शिंदेंबरोबर जमेना पुन्हा पतंगराव कदम साहेबांशी संधान बांधले व ते मला लहान भाऊ समजतात अश्या जाहीर कार्यक्रमात कबुली देत फिरू लागले….
१९९८ ला खंडणीच्या गुन्ह्य़ात अडकल्याने त्यांना कोणताच पक्ष तिकिट द्यायला तयार नव्हता पुन्हा १९९९ ला अपक्ष उमेदवार म्हणून लढले व दणाणून पराभूत झाले ते तत्कालीन अपक्ष आमदारांचे म्होरक्या असलेले मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या टोळीत सामील झाले नंतर पुन्हा काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडक्या कालावधीकरीता गेले व पवार साहेबांना अक्षरशः देव मानुन पुजा करु लागले त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जहरी टिका करु लागले….
शहाबापु नंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आय काँग्रेसमध्ये गेले खरे पण त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले तत्कालीन महसूल मंत्री नारायण तातु राणे यांना ते मोठे नेते मानू लागले राणेंची स्तुती करताना ते पवारसाहेब व शिवसेना नेत्यांची उणी-धुणी काढुन विखारी बोलु लागले
नंतर राणेंनी काँग्रेस सोडली लगेच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना नेते मानायला सुरुवात केली व नारायण राणेंवर खालच्या स्तरावर जाऊन नेहमीच्या सवयी प्रमाणे टिका टिप्पणी करु लागले व पृथ्वीराज चव्हाण तर मला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजतात असे भोळ्या भाबड्या जनतेला जाहिर कार्यक्रमात व खाजगीत मोठ्या आवेशात सांगु लागले…
काही दिवसातच पुन्हा शहा-बापूंनी पक्ष बदलला ते “खेकडाफेम” तानाजी सावंतांच्या मध्यस्थीने शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळचा तानाजी सावंत व शहा-बापुंचा यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाला होता त्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली होती
शिवसेनेत प्रवेश केलेल्यानंतर ते सेनेशी एकनिष्ठ कधीच नव्हते!
सेनेत असूनही ते माढ्याचे भाजप खासदार निंबाळकर यांना ते आपले मोठे नेते व मोठेभाऊ आहेत असे जाहीर कार्यक्रमात सांगायला जराही कचरत नव्हते सेनेत असुनही ते भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची जाहीरात करीत मतदारसंघात बोंबलत फिरत होते त्यांनी शिवसेनेत असताना मतदारसंघात शिवसेना म्हणुन एकही कार्यक्रम घेतलेला नव्हता किंवा एखादी शाखा सुरू केली नव्हती एवढेच काय स्वतच्या तालुक्यात तर सोडाच स्वतःच्या गावात पण दिवंगत बाळ ठाकरेंची जयंती किंवा स्मृतिदिना निमित्त एखादा सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम घेतलेले निदर्शनास नाही.
आणि सध्या तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी करुन गेलेले आहेतच पण जाण्या अगोदर संपूर्ण मतदार संघात अनेक कामांची उद्घाटने करीत फिरत होते मी माझ्या मतदारसंघात मंत्र्यापेक्षा जादा निधी आणला आहे वगैरे वगैरे म्हणुन भाषणं ठोकत फिरत होते नंतर अचानक शिंदे गटात सामील झाल्यावर माझ्या मतदारसंघावर निधीबाबत अन्याय झाला वगैरे असे कांगावे करु लागले
आता तर हद्दच पार केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मला वडीलासमान आहेत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वय शहाजीबापु पेक्षा सात वर्षानी कमी आहे मग शिंदे यांचे वडील कसे? कोणत्या दृष्टीने हे त्यांनाच ठाऊक वरन उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही ते शहा-बापु मोठे भाऊ म्हणतात पण फडणवीस हे सुध्दा शहा-बापु पेक्षा वयाने १६ वर्षे लहान आहेत मग यांचे मोठे बंधु कसे…? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
खा. शरद पवारांना देव मानून पुजनारे शहा-बापु अचानक पवारांच्या सावली पण जायला नको असे आता कण्हत कन्हत आता सध्या म्हणत आहेत. पवार साहेबांनी राज्यातील मोठमोठ्या घराण्यात भांडणे लावून मोठमोठी घरं फोडली आहेत असा आरोप करत सध्या ते पवारांवर आरोप करत आहेत.
अशाप्रकारे त्यांची नाट्यमय राजकीय घोडदौड सुरू आहे
शहा-बापुंनी राजकीय कारकिर्दीत कोणतीही संस्था उभ्या करून चालवल्या नाहीत त्या फक्त सब माल अंदर यासाठी उपयोग करून घेतला तो पुढीलप्रमाणे.
प्रथम कॉंग्रेसमध्ये असताना तुळजा भवानी या नावाने सूतगिरणी मंजुर करुन आणली त्यासाठी तालुक्यातील जनतेकडून मोठ्या प्रमाणात शेअर्सरुपी पैसा गोळा केला मोक्याची ठिकाणी जमीन खरेदी केली. पायाभरणी झाली परंतु गेले २८ ते ३० वर्षांपूर्वी गोळा केलेले पैसे व जमीन सगळे गडप करण्यात शहाबापु यशस्वी झाले. शेअर्सचे पैसे गेले व रस्त्यालगतची जमीन पण गेली नंतर त्यांनी पतंगराव कदम क्रीडेट सोसायटीची स्थापना मोठा गाजा वाजा करत (मिनी बँक) केली.
त्या सोसायटीच्या माध्यमातुन पुन्हा शेअर्सरुपी पैसे गोळा केले व पिग्मीच्या माध्यमातुन पैसे गोळा करुन कर्जवाटप मात्र आपल्याच घरातील लोकांच्या नावाने काढुन ते कर्ज बुडवून ती क्रीडेट सोसायटी पण बुडवली.
काही दिवसातच राधाकृष्ण दुध संघ स्थापन केला लोकांकडुन शेअर्सच्या रुपाने बक्कळ पैसा जमा केला व त्यातुन रस्त्यालगतची जमीन खरेदी केली. कालांतराने संघही नाही पैसेही नाहीत मोक्याची जागा महागात विकुन पैसे गिळून गप्प झाले!
कालांतराने पुन्हा कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी काही गोर-गरीब कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून पुन्हा पैसे गोळा केले व जमीन खरेदी केली मग तीच जमीन पुन्हा चढ्या भावाने विकुन पैसे गडप केले असा शहाबापुंचा सहकार म्हणजे जणू स्वतःसाठी स्वाहाकारचं….!
शहा-बापुंच्या घरातील प्रत्येकाला अलीशान गाड्या स्वतः आ. शहा- बापूंना ५० लाखांची फॉर्चुनर कार व त्यांच्या पत्नी रेखा पाटलांना २० लाखाची क्रेटा कार तर मुलगा दिग्विजय ३० लाखाची एम जी हॅक्टर गाडी तसेच पुतण्या सागर पाटिल ५० लाखाची फॉर्चुनर गाडी मेव्हणा सुरेश कदम यांना १५ लाखाची डस्टर भाच्चा नवा मगर २५ लाखाची एक्स व्ही ७१० गाडी पुतण्या, मेहुणा व भाच्चा शहाबापुंकडेच रहातात म्हणून त्यांचाही उल्लेख केला आहे गैरसमज नसावा.
शहा-बापु सहीत एकुण पाच भाऊ आहेत त्यांना वडीलोपार्जीत १९७ एक्कर जमीन होती ४० एक्करच्या आसपास प्रत्येक भावाच्या वाट्याला आली होती विशेष म्हणजे शहा-बापुंनी स्वतःच्या नावावरची एक गुंठा पण जमीन विकली नाही मात्र भावनीक करुन तर कधी गोडगोड बोलुन काही भावांपैकी कोणाची दोन तर कोणाची चार एक्कर जमीन विकली आहे व स्वतःची जमीन संपूर्ण शाबूत ठेवली आहे!
मग या शहा-बापूंनी राजकारणापायी भाई गणपतरावांच्या विरोधात निवडणूका लढवून २०० एक्कर जमीन कोणाची? कशी व कोणाला विकली असेल..? हा एक विशेष वेगळाच संशोधनाचा विषय आहे
गेल्या साडेतीन ते चार महिन्यांत चिक-महुद या आपल्या मुळगावी २० एक्कर बागायती जमीन खरेदी केली आहे तसेच सांगोला येथे लाखों रुपये खर्चून एक अलीशान संपर्क कार्यालय रुपी दुकान थाटलंय स्वतःच्या चिकमहुद या गावात साधारण १० कोटी रुपये खर्च करून पंचतारांकित बंगला बांधला त्यात गृहप्रवेशाचा कार्यक्रम अगदी परवाच झाला आहे. मी एवढा मोठा खर्च करून बांधलेला बंगला गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रस्त्यावरन दिसत नाही म्हणून गावातील रस्त्यावरचे छोटं छोट्या व्यवसायिकांचे दुकानं जे ग्रामपंचायतीच्या गळ्यात वर्षानुवर्षे असलेले दुकाने काढून टाकून त्या व्यावसायिकांना नवीन गाळे बांधून देतो म्हणत उपासमारीची वेळ आणली आहे
सध्या चिकमहुद गावात जाता येता रस्त्यावरुन शहा-बापुंचा बंगला सहज दिसत आहे पण त्या छोटछोट्या व्यवसायिकांचे पुढे काय?
अनेक वर्तमान पत्रांच्या जाहिरातीचे पैसे कित्येक वर्षे थकीत तर काहींनी पैसे सोडुन दिलेत पण या दोन-तीन वर्षातले जाहिरातीचे लाखों रुपये गेल्या तीन महिन्यांपासून पत्रकारांना बोलावून देण्यात येत आहेत.
५५ वर्षे आमदार असणार्‍या आबासाहेबांना साधी चारचाकी लवकर घेता आली नाही किंवा बंगला शेती घेता आली नाही! पण हे महाशयांना एवढा मोठा बंगला, महागड्या चार पाच गाड्या घेतल्या कशा या बाबतीत भाजपचे ईडीवीर किरीट सोमय्यांना दिसत नसेल का?
अगोदर चार वर्षे आमदार होते तेव्हा आणि आता आमदार असताना बाहेर बोलघेवडे असलेल्या शहाबापुंनी कधी विधानसभेत तालुक्याचा किंवा राज्यातील शेतकरी, शेतमजूर व गोर-गरीबांच्या प्रश्नांवर कधीच तोंड उघडलेले नाही तरीही शहाबापुंचे विनोद ऐकण्यासाठी सांगोला परिसरातील काही लोक करमणुकीचे साधन म्हणून शहाबापुंकडे पहात त्यांचे पांचट व गुळमुळीत चुटकुले ऐकुन टाईमपास करत असतात पण ते आपल्या मताचं कदापि बदल करत नव्हते हे विशेषच!
पण आज शहाबापुंनी मुद्दाम ठरवून स्वतःचाच कॉल रेकॉर्डिंग डोंगार काय झाडी काय हाटील… हे व्हायरल केल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला दोन चार दिवसांसाठी दिवसांसाठी करमणुकीचे साधनं करून दिले होते!
शहा-बापुंच्या गावंढळ डॉयलॉंगवर गीतकारांनी गाणे लिहिले आणि गायले व थोडे दिवस गाजले पण भविष्यात सुरत-गुवाहटी-गोवा या राजकीय घडामोडीवर चित्रपट पण निघू शकतो आणि त्यात सांगोल्याचा सोंगाड्या आमदार झिंगून शिवराळ भाषेत डॉयलॉंग मारताना दिसला तर सांगोलेकरांनों नवल वाटून देऊ नका.
कारण हल्ली इलेक्ट्रिक मिडीयावाले चॅनलची टिआरपी वाढविण्यासाठी काय दाखवशील सांगता येत नाही.
खरं घरा बाहेर पडेपर्यंत खोटं गांव हिंडून आलेले असतयं तशीच गंम्मत या टाईमपास व जोकर आमदारांची झाली आहे!
भाई गणपतराव देशमुख साहेबांनी सांगोल्याची उंची कुठे नेऊन ठेवलेली आणि ह्या पठ्ठ्याने कुठे नेऊन ठेवली आहे याचे उत्तर सुज्ञ सांगोलेकर येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हे बांडगूळ उखडून टाकतीलच.

Leave A Reply

Your email address will not be published.