पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सच्या रूग्णसंख्येत वाढ – जगात 571 मृत्यू

आतापर्यंत जगात मंकीपॉक्समुळे ५७१ रूग्णांचा मृत्यू

0

पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सच्या रूग्णसंख्येत वाढ – जगात 571 मृत्यू

आतापर्यंत जगात मंकीपॉक्समुळे 571 रूग्णांचा मृत्यू

इस्लामाबाद : स्वीडननंतर आता पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सचे तीन प्रकरणे समोर आली आहेत. हे सर्व रूग्ण यूएईला जाऊन परतले होते. रुग्णांमध्ये कोणता प्रकार आहे हे अद्यापपर्र्यंत समजू शकले नाही, त्यामुळे या तिन्ही रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे. यापूर्वी गुरुवारी स्वीडनमध्ये मंकीपॉक्सची एक घटना समोर आली होती. आफ्रिकेनंतरची ही पहिलीच घटना होती. अहवालानुसार, रुग्णामध्ये मंकीपॉक्सचा क्लेड क प्रकार आढळून आला, जो एक घातक प्रकार आहे, असे सांगितले जात आहे. अहवालानुसार, या वर्षात आतापर्यंत जगात मंकीपॉक्समुळे ५७१रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले. मागील दोन वर्षांत या आजाराची आरोग्य आणीबाणी घोषित होण्याची ही दुसरी वेळ आहे. डब्ल्यूएचओच्या मंकीपॉक्स रोगाचा कांगोमध्ये प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेजारी देशही याला बळी पडताना दिसत आहेत.

मंकीपॉक्स हा चेचक सारखा विषाणूजन्य आजार असून त्याच्या संसर्गाचे सहसा दुष्परिणाम होत नाहीत, परंतु ते प्राणघातक ठरू शकतात. यामुळे ब्ल्यूएचओ देखील चिंता व्यक्त केली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने तो अधिक धोकादायक ठरू शकतो. मंकीपॉक्सच्या वेगवेगळ्या प्रादुभार्वांमध्ये मृत्यू दर भिन्न आहेत. अनेक वेळा ते १०% पेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे ब्ल्यूएचओ ने याबाबत सर्वोच्च स्तरावर अलर्ट जारी केला आहे.

संसर्ग भयावह असल्याचा इशारा

कांगोमध्ये झालेल्या या उद्रेकाला क्लेड क म्हणून ओळखले जात आहे. यात लैंगिक संपर्क देखील समाविष्ट आहे. बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा यांसारख्या कांगोच्या शेजारील देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी जगाला एकत्र काम करावे लागेल. यासोबतच हा विषाणूजन्य संसर्ग भयावह वेगाने पसरत असल्याचा इशाराही देण्यात आला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत १६०% ची वाढ

आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या म्हणण्यानुसार या वर्षी आफ्रिकन खंडात आतापर्यंत १७,००० हून अधिक संशयित प्रकरणांची नोंद झाली आहे, तर ५१७ मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी प्रकरणांमध्ये १६०% वाढ झाली आहे. एकूण, १३ देशांमध्ये मंकीपॉक्सच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.