अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ

- मध्य प्रदेशातील पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात

0

अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ

– मध्य प्रदेशातील पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक लेणी पाहून झाल्यावर लेणी परिसरातील पिकनिक पॉइंट व हिरवेगार झालेल्या डोंगररांगांची जंगल सफारी करत भटकंती करीत आहेत. या पर्यटकांमध्ये जळगाव, भुसावळ, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगरसह मध्य प्रदेशातील पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात असते. श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यामध्ये अजिंठा डोंगर पर्वत रांगा पूर्णपणे हिरवाईने नटला आहे. सर्वत्र हिरवळ व खळाळणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत असल्याने अजिंठा लेणी मध्ये हौशी व भटकंती करणाºया पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अजिंठा लेणी परिसरातील लहान मोठे नदी-नाले आणि झरेही आता खळाळून वाहत आहे. त्यामुळे हा परिसर नयनरम्य झाला आहे. अजिंठा लेणी मध्ये हौशी व भटकंती करणारे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहे. पर्यटक लेणी समोरील डोंगर चढून पिकनिक पॉइंटला भेट देतात. तसेच धबधब्याच्या परिसरात पर्यटक आपल्या सोबत असलेल्या जेवणाचाही आनंद लुटत आहेत. डोंगर परिसरात भटकंती करणाºया पर्यटकांना पाहून दुसरे पर्यटक ही डोंगर चढून पिकनिक पॉईंट कडे जात आहे. हिरवीगार जंगल झालेले डोंगर परिसरात भटकंती करत आहे.

पिकनिक पॉइंटवर गर्दी पर्यटक पिकनिक पॉईंट वर जातात व व तेथून लेणीचा परिसर पाहून पुढे जातात व वाहणाºया वाघूर नदीचा उगम असलेल्या जागेवर जाऊन पाहतात व सप्त कुंडा चाही आनंद वरून घेतात. त्या परिसरात वाहणारे छोटे छोटे झरणे आहेत. हे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करताना दितस आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.