धारूर बस स्थानकामध्ये शौचालय नसल्याने प्रवाशांची गैरसोय
-गुत्तेदाराकडून मागील दीड वर्षापासून शौचालयाचे काम सुरूच
धारूर बस स्थानकामध्ये शौचालय नसल्याने प्रवाशांची गैरसोय
-गुत्तेदाराकडून मागील दीड वर्षापासून शौचालयाचे काम सुरूच
धारूर : धारूर बस स्थानकामध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शौचालय बांधकामास १७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर हे काम एका गुत्तेदाराला देण्यात आले. मात्र या गुत्तेदाराकडून हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्यामुळे मागील दीड वर्षात काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
खामगाव – पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर धारूर बस स्थानक आहे. या मार्गावर मागील चार वषार्पासून प्रवाशांची मोठी वर्दळ वाढली आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना शौचालय नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने त्यांना आडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दीड वर्षांपूर्वी येथे नवीन शौचालय बांधकामासाठी १७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर हे काम २ जानेवारी २०२३ मध्ये दुर्गेश दुबे या ठेकेदारास कार्यकारी अभियंता राष्ट्रीय परिवहन महामंडळ संभाजीनगर – २ यांनी काम दिले. काम देताना ९० दिवसाच्या आत काम करून देण्याची हमी गुत्तेदाराने दिली होती. परंतु याला तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटला तरीही धारूर बस स्थानकामध्ये शौचालयाचे काम न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बनावट अंशकालीन प्रमाणपत्र प्रकरणी बीडमध्ये दोघांना अटक
नगर-बीड-परळी रेल्वे अंमळनेर ते विघनवाडीपर्यंत धावली
म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण रद्द करा
ठेकेदारावर कारवाई नाहीच
संबंधित ठेकेदाराला कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून सहा वेळा पत्र व्यवहार केल्यानंतरही सदरील गुत्तेदार हे काम पूर्ण करण्यास तयार नाही. तरीही या गुत्तेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
एक दोन महिन्यात काम पूर्ण होईल
बस स्थानक परिसरात बांधकाम करण्यात येत असलेल्या शौचालयाची आम्ही पाहणी केली. यामध्ये काही काम अर्धवट राहिलेले असून ते पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित गुत्तेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली आहे. पुढील एक दोन महिन्यात काम पूर्ण करून शौचालय वापरासाठी खुले करण्यात येईल असे आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी सांगितले.