लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
मनोज जरांगे यांची सरकारच्या योजनेवर टीका
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
मनोज जरांगे यांची सरकारच्या योजनेवर टीका
जालना : सरकारची मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही. यासाठी ते कोणतरी नवीन योजना आणतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा योजनाही आणतील. या योजनेमुळे गर्दी झाल्यामुळे साईट बंद पडली, एवढा लोड त्यावर आला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नवा डाव टाकला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला आहे. त्यांचे १५०० रुपये आम्हाला आयुष्यभर पुरतील का? काहीतरी नव्या योजना आतात. आता ते लाडका भाऊ, लाडकी मेहुणी व मेहुणा आदी नव्या योजनाही आणतील. त्यांचे दीड हजार रुपये आम्हाला ३ दिवसही पुरणार नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा समाचार घेतला.
लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र
मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
रस्त्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
मनोज जरांगे यांनी शनिवार रोजी आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाला पुन्हा एकदा धोका दिल्याचा आरोप केला. सरकारने धोका दिल्यामुळे माझ्यावर पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली. आता मी मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या तरुणांना नोकरभरती, प्रवेश प्रक्रिया आदी अनेक बाबतींत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने ईडब्ल्यूएस, ईबीसी व कुणबी हे तिन्ही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, असे ते म्हणाले.
सरकारने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. पण अद्याप हे शिक्षण मिळत नाही. मुलींना मोफत शिक्षण द्यायचे असेल तर त्यात भेदभाव करू नका. चंद्रकांत पाटील नुसतेच मोफत शिक्षण दिल्याचा गवगवा करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून मते विकत घेतल्याचे वाटत असेल, पण असे काहीही होणार नाही. तुम्ही देत असलेले १५०० रुपये आम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत का? ते ३ दिवसही पुरणार नाहीत. सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करू शकत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
महाराष्ट्रसह पूर्ण देशामध्ये 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह
दररोज पोहण्याचे 8 फायदे पहाच
Royal Enfield Guerrilla 450 Price in India: रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 मार्केट मध्ये
जात पडताळणी प्रमाणपत्र काढायचे कसे?
सरकारच्या बदलणाºया जीआरमुळे नुकसान होत आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या काळात सरकारने लाडकी बहीण