लंडनच्या ‘The Asian Age’ दैनिकाने घेतली जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची दखल

0

लंडनच्या  ‘The Asian Age’ दैनिकाने घेतली जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची दखल

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी रोजी सोलापुरात शांतता रॅली पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची सभा झाली. सोलापूर शहरातील विविध शाळांसह महाविद्यालयांना आणि शैक्षणिक शैक्षणिक संस्थांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यावेळी या शांतता रॅलीत जिल्ह्यातील मराठा मुस्लिम लिंगायत यांच्यासह सर्व समाजातील समाजबांधव मोठ्या संख्यने सामिल झाले होते. या रॅलीत सामिल झालेल्या मराठा समाज बांधवांसाठी मुस्लिम लिंगायत समाज बांधवांकडून चहा नाष्ट आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. या शांतता रॅलीची दखल आंतरराष्ट्रीय दैनिक ‘The Asian Age’ ने घेतल्याचे समोर आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने सामिल झाला होता. यावेळी रस्त्यावर देखील वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे सोलापुरात मोठी गर्दी पहायला मिळाली. या शांतता रॅलीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव एकत्र येणार आले होते. या शांतता रॅलीनंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा पार पडली. या शांतता रॅलीची दखल लंडन मधील ‘The Asian Age’  या आंतरराष्टीय दैनिकाने आपल्या वर्तमानपत्रातील National या पान नंबर ४ वर शांतता रॅलीची दखल घेत त्याचा फोटो घेतल्याने मराठा आरक्षणाचा लढ्याची दखल घेतल्याचे समोर येत आहे.

मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला ७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून त्याचा शेवट १३ आॅगस्ट रोजी नाशिक येथे समारोप होणार आहे. हा दौरा ७ दिवसांचा असणार आहे. यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता ही शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात सुरू झाली असून बुधवार रोजी सोलापूर येथे निघालेल्या शांतता रॅलीची दखल लंडनमधील दैनिक ‘The Asian Age’  घेतल्याने मराठा समाजाचा आवाज इतर देशातील माध्यमांच्या कानावर पडत आहे. मात्र राज्यातील राजकीय नेत्यांच्या कानात घुसत नसल्याची खंत मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.


मनोज जरांगे पाटील यांचा शांतता रॅलीची दखल ‘The Asian Age’ या दैनिकाने National या पान नंबर ४ वर घेतली असून तसे वृत्त प्रसिध्द केले आहे. ‘The Asian Age’ च्या दिल्ली आणि लंडन आवृत्तीमध्ये National या पान नंबर ४ वर शांतता रॅलीची दखल घेतल्याने देशभरच नव्हे तर संपूर्ण लंडनभर या शांतता रॅलीची वार्ता पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वपक्षीय राजकीय नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागणीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली निघत असून दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा निघत असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅलीत मराठा, बौध्द, धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत आहे. सोलापूर येथील शांतता रॅलीत ठिकठिकाणी मुस्लिम आणि लिंगायत समाज बांधवांकडून पाणी, नाष्ट आणि जेवणाची सोय करीत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत असा नवा संदेश या महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.

२९ ऑगस्ट रोजी निर्णय घेणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकी पक्ष कामाला लागले असले तरी मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.