महावितरण ऑफिसला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुलूप

-वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

0

महावितरण ऑफिसला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुलूप

-वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील गारखेडा परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्या बाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गारखेडा शाखा महावितरण ऑफिस वर आंदोलन करीत ऑफिसच्या दरवाज्यावर कुलूप लावत जोरदार घोषणाबाजी केली.

परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय हॉस्पिटल मध्ये रुग्णाचे हाल होत असल्याचं आंदोलक म्हटले. पाणी पुरवठा होणाऱ्या वेळामध्ये वीज जाते त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वीज गेल्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला जॉब गमवल्याचं राज निळ यांनी सांगितले. यामुळे परिसरातील वीज पुरवठा सुरूळीत करावा या मागणीसाठी आंदोलकांनी गारखेडा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

मागील काही दिवसांपासून शहरामध्ये विधानसभा निवडणुकीची जारेदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या नेत्याचे दौरे वाढले आहेत. याचवेळी शिवसेना उबाठा देखील आक्रमक झाल्याचे दिसत असून ते आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.