मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित
13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
जालना : मराठा समाजाचा सरसकट कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेष करावा या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोशण करीत होते. मात्र आंदोलनाच्या पाचव्या दिवषी त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. यापूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जून ते 13 जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. 13 जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काल रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्ती करून सलाईन लावली. यावेळी ते म्हणाले की, सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही, असे म्हणत तुम्हाला दोन महिने हवे होते, त्यानुसार मी 13 ऑगस्टर्यंतची मुदत देतो. तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे दोन महिन्यात दिलेला शब्द पाळा, असे म्हणत त्यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण
मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र योजना’ सुरु केली -बजेटवरून ठाकरेंचा मोदींना टोला
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, रात्री तब्येत खराब झाली होती, रक्तातील साखरेचं प्रमाण 60 पर्यंत घसरलं होतं. मला माझे सगळे सहकारी समजावत होते की तुम्ही सलाईन लावून घ्या. मी त्यांना म्हटलं, मला लढू द्या, उपोषण करू द्या, परंतु ते म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे आहात आणि आरक्षणही हवं आहे. तुम्ही नसाल तर आम्हाला काही मिळणार नाही. रात्री माझ्याबरोबर काय होत होतं ते कळत नव्हतं. चार-पाच जणांनी माझे हात पाय धरले आणि सलाईन लावली. ही सगळी मंडळी या गोष्टी माझ्या मायेपोटी करत आहेत. ते मला म्हणतात, आम्हाला तुम्ही हवे आहात, आरक्षणही हवं आहे. तुम्ही राहिलात तर आरक्षण द्याल, तुम्ही मैदानात असाल तर आपल्या समाजाला न्याय मिळेल. म्हणून त्यांनी रात्री मला जबरदस्तीने सलाईन लावली.” म्हणून नाईलाजाने उपोषण स्थगित करावे लागले.
बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर आमदार खासदार हाय… हाय.. म्हणत आंदोलकांचा संताप
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत -लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका
शंभूराज देसाई दिलेला शब्द पाळा : मनोज जरांगे
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले होते, आम्ही मनोज जरांगेंकडे दोन महिन्यांची मुदत मागितली होती. त्यानंतर मी त्यांना 13 जून ते 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला होता. त्यांना अजून एक महिना हवा होता. यावर मी विचार केला की इथे पडून राहिलो तरी त्यांना तो वेळ मिळणारच आहे. त्यापेक्षा मी आता ठरवलं आहे आता हे उपोषण स्थगित करेन आणि सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ देईन. माझं आवाहन आहे, 13 ऑगस्टपर्यंत तुम्ही करून दाखवा, तुम्ही दोन महिने मागितले होते, 13 जून ते 13 ऑगस्टपर्यंतचे दोन महिने घ्या आणि मराठ्यांाना आरक्षण देऊन तुम्ही दिलेला शब्द पाळा.
अब्दुल सत्तार-जो पक्षसाठी काम करेल त्याला न्याय मिळेल -मंत्री अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन
निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप? माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या वक्तव्याने खळबळ