राजरत्न आंबेडकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा
मी देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर भूमिका बदलत नाही - राजरत्न आंबेडकर
मी देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर भूमिका बदलत नाही – राजरत्न आंबेडकर
राजरत्न आंबेडकर यांचा रोख कोणाकडे
जालना : विदर्भातील मराठ्यांना आरक्षण मिळत आहे, कोकणातील मराठा ही आरक्षणात असेल तर मराठवाड्यातील मराठ्याला प्रांतवाईज भेदभाव कारताय का? मराठवाड्यातील मराठा हा त्या चौकटीत समाविष्ठ करता येत नाही का? आमची सुरूवातीपासून मनोज जरांगे पाटील आणि त्यांची जी मागणी आहे त्याला आमचा पाठिंबा दिला आहे.
ज्यावेळी आमची छत्रपती संभाजीनगर येथे मराठा बौध्द ऐक्य परिषद सोडून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. आणि तेव्हापासून तोच स्टॅंड आजपर्यंत घेतला आहे, कारण मी देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर भूमिका बदलत नाही, असे म्हणत राजरत्न आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावल्याचे बोलले जात आहे. राजरत्न आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आले असता ते बोलत होते.
सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ
अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा
प्रवीण दरेकरांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न: मनोज जरांगे
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यांनतर माध्यमांशी बोलताना राजरत्न आंबेडकर यांना माध्यमांच्या प्रतिनिधींना काही प्रश्न विचारले. यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाविषयी विचारले असता राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे नेमक कोणापासून बचाव? ओबीसींचे आरक्षण नेमक कोण लाटतय याचा जर आभ्यास करण्यासाठी घेतला तर पुजा खेडकर सारखी एक स्त्री बोगस प्रमाणपत्रावर ओबीसींचे आरक्षण लाटते म्हणजे ओबीसीमधील गर्भश्रीमंत लोकच गरीब ओबीसींचे आरक्षण खात आहेत, असे राजरत्न आंबेडकर म्हणाले. त्यामुळे राजरत्न आंबेडकर यांना जे समजल ते प्रकाश आंबेडकर यांना का समजत नसेल? की ते जाणिवपूर्वक बनाव करीत असतील, असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे. मागील दोन महिन्यांपासून जे पुजा खेडकर प्रकरण आहे त्यातून ओबीसींचे आरक्षण कोण धोक्यात आणतय हे सहज लक्षात येते, असे राजरत्न आंबेडकर जरी म्हणाले असले तरी मात्र प्रकाश आंबेडकर हे पुजा खेडकर प्रकरणावर जाणिवपूर्वक पडदा टाकण्याचे काम करताना दिसतात. यामागचे खरे कारण पुजा खेडकर हीचे वडील प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुुजन आघाडीचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार होते म्हणून तर प्रकाश आंबेडकर हे या प्रकरणाला बगल देताना दिसत असावेत असेही बोलले जात आहे.
राजरत्न आंबेडकर म्हणाले की, गरीब मराठा समाज आज या महाराष्ट्राचा मालक असायला हवा होता मात्र राज्य सरकारने गरीब मराठ्यांची हालत केल्यामुळे गरीब मराठा कोणत्याही न्यायापालिकेत कोणताही न्यायाधीश नाही, प्रशासनात एकही गरीब मराठा आयएएस अधिकारी नाही, म्हणून गरीब मराठ्यांची जी लढाई मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे तिला आमची साथ आहे, असा विश्वास राजरत्न आंबेडकर यांनी बोलून दाखविल्याने पुन्हा एकदा मराठा बौध्द एक असल्याचे सिध्द झाले आहे. मात्र राजरत्न आंबेडकर यांनी आपण कधीही भूमिका बदलत नाही अथवा देवेंद्राच्या इशा-यावर काम करीत नसल्याचे सांगून नेमका कोणाला टोला लगावला हे जरी त्यांनी मोकळेपणाने सांगितले नसले तरी वारंवार भूमिका बदलणा-या प्रकाश आंबेडकरांकडे त्याचा निशाणा असल्याची चर्चा सुरू झाल्याने प्रकाश आंबेडकर यावर नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या खांद्यावर कोणाचे ओझे?
ओबीसी आरक्षण बचाव ची भूमिका घेण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सगेसोयरे आणि कुणबी नोंदीला कडाडून विरोध करीत त्या रद्द कराव्यात या मागणीसाठी त्यांच्या पक्षाच्या वतीने ठराव पास केला. त्यांनतर त्यांनी ओबीसी आरक्षण बचावच्या माध्यमातून एक यात्रा सुरू केली. या यात्रेला पकंजा मुंडेे यांनी शुभेच्छा देत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात दुसरीकडे ज्यांनी संपूर्ण आयुष्यात या महाराष्ट्रात संघ भाजपची कीड पोसून मनुवादी विचारांनी हा महाराष्ट्र पोखरला त्या गोपीनाथ मुंडे यांचे फोटो प्रकाश आंबेडकर यांना फिरवावे लागत असल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या डोक्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाचवतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यामुळे डाॅ. बाबासाहेबांच्या वारसांना संघ भाजपच्या आदर्शाचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन मिरवावे लागत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.