नगर-बीड-परळी रेल्वे अंमळनेर ते विघनवाडीपर्यंत धावली
- ६६.१२ किलोमिटर अंतरावर रेल्वेची हायस्पीड चाचणी
नगर-बीड-परळी रेल्वे अंमळनेर ते विघनवाडीपर्यंत धावली
– ६६.१२ किलोमिटर अंतरावर रेल्वेची हायस्पीड चाचणी
बीड : मागील अनेक वर्षांपासून बीडकरांच्या प्रतिक्षेत असलेली नगर-बीड-परळी रेल्वे कधी धावणार असा वारंवार प्रश्न विचारला जात असतानाच या मार्गावरील अंमळनेर ते विघनवाडी पर्यंत नवीन रेल्वे मार्गाची शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत जलदगती चाचणी व निरिक्षण केले जाणार असल्याची माहिती सर्वत्र पोहोचल्याने परिसरातील सर्वांचे चेहऱ्यावर हस्य दिसत होते. यामध्ये अहमदनगर ते विघनवाडी पर्यंतचे ६६.१२ किलोमिटर अंतरावर रेल्वेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असुन त्यासाठीच ही हायस्पीड चाचणी घेण्यात आली.
म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण रद्द करा
अजित पवारांचा पक्ष म्हणजे आलीबाबा आणि ४० चोरांची टोळी – महेबुब शेख
‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नगर मध्य रेल्वे बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता बांधकाम राकेश कुमार यादव यांनी बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक,अंमळनेर ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना पत्र पाठवुन सुचीत केले होते. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ जवळील नदीवर १३ गाळे असलेला मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची उंची ३३ फुट आहे. दक्षिण मध्य रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
अंमळनेर ते विघनवाडी या लोहमार्गाच्या जलदगती चाचणी दरम्यान नागरिकांनी रेल्वे मागार्पासून दुर रहावे, गुरे, पाळीव प्राणी हे रेल्वे रूळावर येणार नाहीत याची काळी घ्यावी त्याच बरोबर नागरिकांनी लोहमार्गा लगत येवु नये, रेल्वे मार्ग ओलांडू नये असे रेल्वे विभागाने अंमळनेर व विघनवाडी हद्दतील सरपंच, गावकरी, नागरिकांना आवाहन करण्यात आले.
बीड जिल्ह्यात २३.५ किलोमीटर अंतरात रेल्वे धावली
आतापर्यंत बीड जिल्ह्याच्या हद्दीत २३.५ किलोमीटर अंतरात प्रत्यक्ष रेल्वे धावली आहे. नगर ते नारायणडोह या १२ किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गावर मार्च २०१८ मध्ये रेल्वेचे इंजिन धावले होते.
Image credit: Pixabay