कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड

सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक मृत्यू झालाचे संशोधनातून समोर - भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अल जझीरानचा दावा

0

कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड


सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक मृत्यू झालाचे संशोधनातून समोर


भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अल जझीरानचा दावा

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, असे भारत सरकारने सांगितले होते. मात्र आता नव्या अहवालात सरकारचे हे आकडे चुकीचे असल्याचे घोषित केले आहे. त्यातच  २०२० मध्ये भारतात कोरोनामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे अल जझीराने यांनी जगभरातील १० मोठ्या डेमोग्राफर्स​​​​​​ आणि अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालाचा हवाला देत सांगितले आहे. मात्र डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात ही आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे आणि दावा केला आहे की भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, जो संपूर्ण जगात सर्वाधिक होता.
सायन्स अ‍ॅडव्हान्स पब्लिकेशनने हा अहवाल १९ जुलै रोजी प्रकाशित केला, जो भारत सरकारच्या २०१९-२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या आधारे तयार करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात भारतात सुमारे १२ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये दिलेली आकडेवारी डब्ल्यूएचओच्या आकडेवारीपेक्षा दीड पट अधिक आहे.

अमेरिकेत कोरोनाचे पुनरार्गमन – कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकादा मास्क सक्ती
कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती
कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

सरकारी आकडेवारीनुसार, २०२० मध्ये कोरोनाचा पहिला टप्पा आणि २०२१ मध्ये डेल्टा लहरीसह दुसरा टप्पा झाल्यानंतर देशात महामारीमुळे ४.८१ लाख लोकांचा मृत्यू झाला.
डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात ही आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे आणि दावा केला आहे की भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, जो संपूर्ण जगात सर्वाधिक होता. मात्र केंद्र सरकारने हे आकडे फेटाळले होते. डेटा मिळविण्याचे यूएन मॉडेल चुकीचे आहे आणि ते भारतासाठी योग्यरित्या लागू केले जाऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले होते. तर दुसरीकडे अनेक सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि संशोधकांनी देखील सातत्याने भारत सरकारचा डेटा चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
या नव्या अहवालावर भारत सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानंतर सरकारच्या आकडेवारीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. २४ जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला कोविडमुळे जगभरात सुमारे ७० लाख लोकांचा मृत्यू झाला. ३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली. कोविडमुळे अमेरिकेत सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला. २७ जानेवारी २०२० रोजी भारतातील पहिली केस केरळमध्ये आढळून आली. यामध्ये  देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४.५० कोटींच्या पुढे गेली आहे. व्हायरसपासून बरे झालेल्या लोकांची संख्या ४.४५ कोटी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील पुनर्प्राप्ती दर ९८.८१% आहे. भारतात कोविडमुळे आतापर्यंत ५ लाख ३३ हजार ५९६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुस्लिम नागरिकांच्या जीवनदरात ५.४ वर्षांनी घट

यामधील संशोधनानुसार २०२० मध्ये सवर्ण हिंदूंचे सरासरी आयुर्मान १.३ वर्षांनी घटले असाही दावा करण्यात आला आहे. तसेच अनुसूचित जातीच्या लोकांचे सरासरी जीवन दर २.७ वर्षांनी घसरले. तर मुस्लिम नागरिकांचे जीवनदर पूर्वीच्या तुलनेत ५.४ वर्षांनी घटले आहे.

महिलांच्या आर्युमान ३ वर्षांनी घटले

कोरोनाचा प्रभाव पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून आला. एकीकडे पुरुषांचे सरासरी आर्युमान २.१ वर्षांनी घटले तर महिलांचे ३ वर्षांनी घटल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच पुरुषांचे जीवनमान महिलांच्या तुलनेत अधिक घसरले आहे, असे जगभरातील आकडेवारीवर सहज लक्षात येते.

डेल्टा लाटेमुळे ४० लाख लोकांचा मृत्यू

सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चचे संचालक प्रभात झा यांनीही डब्ल्यूएचओच्या आकडेवारीचे समर्थन केले. ते म्हणाले, आम्हाला मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-१९ मुळे सुमारे ४० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ३० लाख लोकांचा मृत्यू डेल्टा लाटेमुळे झाला होता.

कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे मत – स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात भिन्न
कोरोना लसीची मागणी शून्य, लशींचे 60 लाख डोस पडून
कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा

Leave A Reply

Your email address will not be published.