बीड जिल्ह्यात केवळ 16.05 टक्के पाणीसाठा

-येणाºया काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

0

बीड जिल्ह्यात केवळ 16.05 टक्के पाणीसाठा

-येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

बीड : यावर्षीचा अर्धा पावसाळा संपला असला तरी बीड जिल्ह्यात मोठा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तळाशीच आहेत. जिल्ह्यातील नद्यानाल्यांना अजूनही म्हणावे तसे पाणी वाहिले नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ १६.०५ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

बीड जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पाची क्षमता ४५४ ददलघमी असताना येथील पाणी मृतसाठ्यात गेले आहे. त्यात ११५ दलघमी म्हणजेच शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांची तहान भागवणाºया मांजरा धरणात केवळ २.४९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या जिल्ह्यातील १४३ सिंचन प्रकल्पात केवळ टक्के पाणी असल्याने जिल्ह्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान

जिल्ह्यातील २५ लाखांच्या जवळपास जनतेची तहान भागवण्यासाठी या सिंचन प्रकल्पातील पाणी वापरले जाते. आगामी गौरी-गणपती, पोळा या काळात व परतीचा पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पात पाणीसाठा वाढू शकतो. उपलब्ध पाणी पावसाळ्यात पाणीसाठा वाढेपर्यंत पुरवणे हे आव्हान प्रशासना समोर असणार आहे.

२८ प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात असलेल्या प्रकल्पापैकी १९ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. तर दुसरीकडे ६७ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. सुमारे २४ प्रकल्पांत २५ टक्कयांहून कमी पाणी शिल्लक आहे. १५ प्रकल्पांत ५० टक्कयांपर्यंत पाणी आहे. तर सात तलावांत ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे २८ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.